मुंबई - चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधाना आणि दिप्ती शर्मा यांना थांबण्याच्या ठावठिकाणाची माहिती न पुरविल्यामुळे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीतर्फे (नाडा) नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, बीसीसीआयने उशीर होण्यासाठी 'पासवर्डमध्ये गडबड' झाल्याचा हवाला दिला आहे.
नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी सांगितले की, 'बीसीसीआय आपल्या पाच खेळाडूंच्या ठिकाणांची माहिती देण्यास असमर्थ राहिल्यामुळे आम्ही ही नोटीस पाठवली आहे.'
काय आहे प्रकरण -
प्रत्येक खेळाडूला डोपिंग विरोधी प्रशासकीय व व्यवस्थापन प्रणालीसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये व्हेअर अबाऊट्स फॉर्म भरावयाचा असतो. तो फॉर्म दोन पद्धतीने भरता येतो. एक तर हा फॉर्म खेळाडू स्वत: भरू शकतात. तर दुसरीकडे महासंघ त्या खेळाडूंची माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करतो.
काही खेळातील खेळाडू जास्त शिकलेले नसतात किंवा त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नसते. याकारणाने महासंघ खेळाडूंची माहिती स्वत: अपलोड करते. पण क्रिकेटपटू शिक्षित असतात आणि ते तसे करू शकतात, कदाचित त्यांच्याकडे वेळ नसावा किंवा अन्य कुठले कारण असावे. त्यामुळे संबंधित महासंघ, बीसीसीआयने खेळाडूंच्या ठावठिकाण्याची माहिती अपलोड करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण ही माहिती बीसीसीआयने मागील तीन महिन्यापासून दिलेली नाही.
यावर बोलताना नवीन अग्रवाल म्हणाले, 'बीसीसीआयने या प्रश्नाचे दिलेले उत्तर योग्य वाटत आहे, परंतु निर्णय घेतला जाईल. त्यांनी सांगितले की पासवर्ड संबंधात गडबड झाली आहे आणि आता सांगत आहेत की समस्या सुटलेली आहे. बीसीसीआयच्या या उत्तरावर चर्चा होईल.'
दरम्यान, माहिती न देण्याचा प्रकार तीन वेळा न केल्यास खेळाडूवर नाडाकडून दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते.
हेही वाचा - माझे पुनरागमन संस्मरणीय ठरावे - सरफराज अहमद
हेही वाचा - आफ्रिदीला कोरोना झाल्यावर गौतम गंभीरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...