दुबई - ऑस्ट्रेलियाचा आक्रमक आणि आयपीएलमधील कोलकाता संघाचा माजी सलामीवीर ख्रिस लिन याने सोमवारी टी-१० लीगमध्ये आतषबाजी खेळी केली. अबू धाबी येथे सुरू असलेल्या टी-१० लीगमध्ये लीनने मराठा अरेबियन्सकडून खेळताना ३० चेंडूत ९१ नाबाद धावा ठोकल्या. काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघातून लीनला डच्चू मिळाला आहे.
-
Top Knock @lynny50 and of course the Man of the Match who lit up Abudhabi Cricket 🏟️ with the 🎆🎇 #AalaReAala #MarathaArabians #T10League #ChrisLynn pic.twitter.com/Qd47lRdrRg
— Maratha Arabians (@MarathaArabians) November 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Top Knock @lynny50 and of course the Man of the Match who lit up Abudhabi Cricket 🏟️ with the 🎆🎇 #AalaReAala #MarathaArabians #T10League #ChrisLynn pic.twitter.com/Qd47lRdrRg
— Maratha Arabians (@MarathaArabians) November 18, 2019Top Knock @lynny50 and of course the Man of the Match who lit up Abudhabi Cricket 🏟️ with the 🎆🎇 #AalaReAala #MarathaArabians #T10League #ChrisLynn pic.twitter.com/Qd47lRdrRg
— Maratha Arabians (@MarathaArabians) November 18, 2019
हेही वाचा - अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, अंधेरीच्या क्रिकेटपटूला मिळाली संधी
टी-१० लीगमध्ये युवराज सिंग प्रतिनिधित्व करत असलेल्या मराठा अरेबियन्स संघाकडून लीनने या खेळीत ९ चौकार व ७ षटकार ठोकले. दहा षटकांच्या स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली असली तरी, या लीगमध्ये पहिला शतकवीर होण्यापासून त्याला वंचित रहावे लागले. लीनच्या या वादळी खेळीमुळे संघाला मोठा विजय मिळवता आला.
लीनच्या बाबतीत कोलकाताचा निर्णय चुकला असल्याचे मत युवराज सिंगने मांडले आहे. आयपीएल २०२० च्या लिलाव प्रक्रियेआधीच लीनला डच्चू मिळाला आहे. लीनला केकेआरने ९.६ कोटी इतक्या किंमतीत खरेदी केले होते. त्याने गेल्या हंगामात १३ सामन्यात ४०५ आणि २०१८ मध्ये १६ सामन्यात ४९१ धावा केल्या होत्या.