ETV Bharat / sports

विल्यमसनची कसोटी कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार का?, न्यूझीलंड बोर्डाने दिलं 'हे' उत्तर - new zealand cricket team captain

न्यूझीलंडचा सुपरकूल खेळाडू केन विल्यमसनची कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली. तेव्हा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत विल्यमसन कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहील, असे स्पष्ट केले आहे.

Kane Williamsons test captaincy not under threat - NZC
विल्यमसनची कसोटी कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार का?, न्यूझीलंड बोर्डाने दिलं 'हे' उत्तर
author img

By

Published : May 20, 2020, 7:51 PM IST

वेलिंग्टन - न्यूझीलंडचा सुपरकूल खेळाडू केन विल्यमसनची कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली. तेव्हा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत विल्यमसन कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहील, असे स्पष्ट केले आहे. यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा दारूण पराभव झाला. यजमान ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-०ने जिंकली. या पराभवानंतर केन विल्यमसनकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून टॉम लाथमकडे देण्यात येणार असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. याशिवाय संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड लाथमला कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. यावर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिले.

न्यूझीलंड संघाच्या प्रवक्त्याने माध्यमानाला सांगितले, 'या निव्वळ अफवा असून केन विल्यमसन कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहिल. विल्यमसनच्या कर्णधारपदाला कोणताही धोका नाही.'

दरम्यान, न्यूझीलंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, भारतीय संघ न्यूझीलंडला गेला होता. यात भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ५-०ने जिंकली. यानंतर न्यूझीलंडने एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत शानदार पुनरागमन केले. ही मालिका न्यूझीलंडने ३-० ने जिंकली. तसेच कसोटी मालिकेतही न्यूझीलंडने भारताला २-० ने व्हाईटवॉश दिला होता.

हेही वाचा - करिअरच्या सुरूवातीला 'या' गोलंदाजाला खेळणं कठीण ठरलं - विराट

हेही वाचा - पत्नीसाठी काय पण..! विराट अनुष्कासाठी बनला डायनॉसोर, पाहा मजेशीर व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.