ETV Bharat / sports

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आमच्यासाठी नाणेफेक ठरली गेमचेंजर -  जॉनी बेअरस्टो - Sunrisers Hyderabad

हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो शानदार फलंदाजी करत २८ चेंडूत ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती

जॉनी बेअरस्टो
author img

By

Published : Apr 5, 2019, 3:15 PM IST

दिल्ली - आयपीएलमध्ये गुरुवारी फिरोजशाह कोटला मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादच्या संघाने दिल्लीवर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो शानदार फलंदाजी करत २८ चेंडूत ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासाठी त्याला सामनाविराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सामना झाल्यानंतर बेअरस्टो म्हणाला की, हैदराबादच्या तुलनेत दिल्लीच्या खेळपट्टीवर चेंडू कमी उसळी घेतहोता. त्यामुळे येथे टॉस जिंकणे आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होते.

आम्हाला स्पर्धेत मिळालेली सुरुवात समाधानकारक असल्याने मी खूप खुश आहे. आमच्या संघाने मागीस तीन सामने सलग जिंकण्यात यश मिळवले आहे. पुढेही आम्हाला अशाच प्रकारचे क्रिकेट खेळण्याची गरज असून आयपीएलमध्ये हैदराबादचा संघ एक सर्वोत्तम संघांपैकी एक असल्याचेही बेअरस्टो म्हणाला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.