मँचेस्टर - क्वारंटाईन कालावधीत असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला ऑनलाइन वर्णद्वेषी टिप्पण्यांना सामोरे जावे लागले आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध पहिला कसोटी सामना संपल्यानंतर इंग्लंडचा संघ मँचेस्टरकडे रवाना झाला. यावेळी जोफ्रा आर्चर आपल्या घरी गेला होता.
यापूर्वीही, आर्चरला मागील वर्षी न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत वर्णद्वेषी वागणूक मिळाली होती. आर्चरने म्हटले, "गेल्या काही दिवसांपासून मी अनेक सोशल मीडिया प्रोफाइलला वगळले आहे. मी त्यांना अनावश्यक आवाज मानतो. दोन विकेट घ्या आणि पुन्हा एकदा हे लोक तुमच्याकडे परत येतील. आम्ही अत्यंत अस्थिर जगात राहत आहोत."
आर्चर पुढे म्हणाला, "गेल्या काही दिवसांमध्ये मला इन्स्टाग्रामवर प्राप्त झालेल्या शिव्या वर्णद्वेषाच्या होत्या. जेव्हा 12 वर्षाच्या मुलाने क्रिस्टल पॅलेसचा फुटबॉलपटू विल्फ्रेड जाहावर ऑनलाइन वर्णद्वेषाचे भाष्य केले. तेव्हापासून या प्रकारच्या गोष्टी सहन करणार नाही, असे मी ठरवले. म्हणून मी ईसीबीकडे तक्रार केली आहे.''
आर्चरला वेस्ट इंडिजबरोबर खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेत जैव सुरक्षित प्रोटोकॉल तोडल्याबद्दल इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) दंड ठोठावला आहे. यासोबतच त्याला लेखी इशारा देखील देण्यात आला आहे. या शिक्षेमुळे आर्चरला दुसर्या कसोटी सामन्यातून बाद केले गेले. पण आता तो तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंड संघात सामील होणार आहे.