सिडनी - बॉक्सिंग डे सामन्यात भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट आणि नवोदीत विल पुकोव्सकी परतले आहेत. तर खराब कामगिरी करणाऱ्या जो बर्न्सला संघातून वगळण्यात आले आहे.
डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट आणि विल पुकोव्सकी हे तिघेही दुखापतग्रस्त होते. दुखापतीतून सावरल्यानंतर तिघांचा समावेश ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आला आहे. जो बर्न्सला भारताविरुद्धच्या दोन सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघातून वगळण्यात आले आहे.
उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ -
- टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट, कॅमरुन ग्रीन, ट्रॅविस हेड, मोईजस हेन्रिकेज, जोश हेजलवूड, मार्कस हॅरीस, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपन्सन आणि मॅथ्यू वेड.
सद्यघडीला मालिका बरोबरीत
अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाचा ८ गडी राखून दारूण पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतीय संघाने आपली कामगिरी उंचावत त्या पराभवाची परतफेड केली. मेलबर्नच्या एमसीजी मैदानात खेळवण्यात आलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
हेही वाचा - फवाद आलम...तब्बल ११ वर्षांनी शतक ठोकणारा पाकिस्तानी फलंदाज
हेही वाचा - ''ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज्जांनी अजिंक्यचे केलेले कौतुक आनंददायी''