नवी दिल्ली - शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लडने न्यूझीलंडचा पराभव केला. मात्र, या सामन्यात पार पडलेल्या सुपरओव्हरच्या नाट्यानंतर आयसीसीला चांगलेच सुनावले गेले होते. आयसीसीने काल सोमवारी झालेल्या बैठकीत या सुपर ओव्हरच्या नियमात बदल केला.
हेही वाचा - ख्रिस्तियानो रोनाल्डोने झळकावला ७०० वा ऐतिहासिक गोल, तरीही.......
न्यूझीलंडचा फलंदाज जिमी नीशम याने या बदललेल्या नियमावर आयसीसीला टोला लगावला आहे. 'पुढचे धोरण - जहाज बुडाल्यावर उत्तम दुर्बिणीचा काय उपयोग?' असे ट्विट करत नीशमने आयसीसीला टोला लगावला आहे. आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दिलेल्या या चार धावांच्या ओव्हरथ्रोवर खूप वादविवाद झाले होते. या धावा दोन्ही संघांच्या निर्णयावर परिणाम करु शकल्या असत्या. त्यावेळी उपस्थित पंच कुमार धर्मसेनाने यांनी सहा धावा इंग्लंडला दिल्या होत्या. या विवादानंतर, धर्मसेना यांनी आपली चूक मान्य केली होती.
-
Next on the agenda: Better binoculars for the Ice spotters on the Titanic https://t.co/nwUp4Ks3Mp
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) October 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Next on the agenda: Better binoculars for the Ice spotters on the Titanic https://t.co/nwUp4Ks3Mp
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) October 14, 2019Next on the agenda: Better binoculars for the Ice spotters on the Titanic https://t.co/nwUp4Ks3Mp
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) October 14, 2019
१९१२ मध्ये टायटॅनिक नावाचे प्रवासी जहाज हिमनगाला धडकल्याने बुडाले होते. त्यामुळे दुर्बिणी देण्याचा काही उपयोग नाही. कारण न्यूझीलंडने हा सामना गमावला आहे, असे अप्रत्यक्षपणे नीशमने आयसीसीला म्हटले आहे.
आयसीसीचा नवीन नियम -
जर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या गटसाखळीच्या सामन्यात सुपर ओव्हर टाय झाली तर सो सामना टाय होईल. उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा ती खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल', असे आयसीसीच्या नवीन नियमात ठरवले गेले आहे.