ETV Bharat / sports

रणजी करंडकमध्ये जयदेव उनाडकटचा विक्रम, मोडला २१ वर्षांचा 'हा' जुना रेकॉर्ड

जयदेव उनाडकटने गुजरातविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ७ गडी बाद केले. त्याने २०१९-२० या रणजी हंगामात खेळताना आतापर्यंत ६५ गडी बाद केले आहेत.

jaydev unadkat now holds the records of most number of wickets by a pacer in a single ranji season
रणजी करंडकात जयदेव उनाडकटचा विक्रम, मोडला २१ वर्षांचा 'हा' जुना रेकॉर्ड
author img

By

Published : Mar 5, 2020, 10:40 AM IST

मुंबई - सौराष्ट्र संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बुधवारी गुजरातविरुद्धच्या उपांत्य सामन्यात सौराष्ट्रने ९२ धावांनी विजय मिळवला. या विजयात कर्णधार जयदेव उनाडकटने महत्वपूर्ण भूमिका निभावली. त्याने या सामन्यात १० गडी टिपले. यासह उनाडकट रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात एका हंगामामध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने डोडा गणेश याचा २१ वर्षांचा जुना विक्रम मोडित काढला.

गुजरातविरुद्धचा उपांत्य सामना -

जयदेव उनाडकटने गुजरातविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ७ गडी बाद केले. त्याने २०१९-२० या रणजी हंगामात खेळताना आतापर्यंत ६५ गडी बाद केले आहेत.

गणेशचा २१ वर्ष जुना विक्रम मोडला -

रणजी करंडक स्पर्धेच्या १९९८-९९ या हंगामात खेळताना वेगवान गोलंदाज डोडा गणेश याने ६२ गडी बाद केले होते. त्याचा विक्रम जयदेव उनाडकटने मोडित काढला.

उपांत्य सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सौराष्ट्रने शेल्डन जॅक्सनच्या शतकी खेळाच्या जोरावर पहिल्या डावात ३०४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल गुजरातचा संघ पहिल्या डावात २५२ धावांपर्यंत मजल मारू शकला.

दुसऱ्या डावात सौराष्ट्रची अवस्था १५ धावांवर ५ गडी बाद अशी झाली. तेव्हा मधल्या फळीत चेतन सकारियाच्या ४५ धावा, अर्पित वसवडाचे शतक झळकावत संघाचा डाव सावरला. त्यांना चिराग जानीने अर्धशतक झळकावत चांगली साथ दिली. या तिघांच्या खेळीच्या जोरावर सौराष्ट्राला २७४ धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात गुजरातकडून चिंतन गजाने ७ बळी घेतले. सौराष्ट्रने गुजरातसमोर विजयासाठी ३२७ धावांचे आव्हान ठेवले.

कर्णधार उनाडकटच्या भेदक गोलंदाजीसमोर दुसऱ्या डावात गुजरातच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकवेळ गुजरातची अवस्था ५ बाद ६३ अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार पार्थिव पटेल आणि चिराग गांधीने अनुक्रमे ९३ आणि ९६ धावांची खेळी करत चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र सौराष्ट्रच्या गोलंदाजांसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. अंतिम सामन्यात सौराष्ट्रसमोर बंगालचे आव्हान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.