नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव (बीसीसीआय) जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी निवड झाली आहे. जय शाह यांनी बांगलादेशच्या नजमुल हसन यांची जागा घेतली.
बीसीसीआयचे खजिनदार अरुणसिंग धुमाळ यांनी ही माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत लिहिले की, जय शाह यांचे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन. मला खात्री आहे की, त्यांच्या नेतृत्वात एसीसी अधिक उंची गाठेल आणि सर्व आशियाई प्रदेशातील क्रिकेटपटूंना त्यांचा फायदा होईल. यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा.
-
Congratulations @JayShah on taking over as President of Asian Cricket Council. I’m sure ACC will achieve greater heights under ur leadership and the cricketers of the entire Asian region will benefit. My best wishes for a successful tenure. @bcci @SGanguly99 @ShuklaRajiv
— Thakur Arun Singh (@ThakurArunS) January 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations @JayShah on taking over as President of Asian Cricket Council. I’m sure ACC will achieve greater heights under ur leadership and the cricketers of the entire Asian region will benefit. My best wishes for a successful tenure. @bcci @SGanguly99 @ShuklaRajiv
— Thakur Arun Singh (@ThakurArunS) January 30, 2021Congratulations @JayShah on taking over as President of Asian Cricket Council. I’m sure ACC will achieve greater heights under ur leadership and the cricketers of the entire Asian region will benefit. My best wishes for a successful tenure. @bcci @SGanguly99 @ShuklaRajiv
— Thakur Arun Singh (@ThakurArunS) January 30, 2021
बीसीसीआयचे अध्यक्ष एसीसीचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतात, परंतु या प्रकरणात ही जबाबदारी मंडळाच्या सचिवावर सोपविण्यात आली आहे. १९८३मध्ये एसीसीची स्थापना झाली. आशियामधील क्रिकेटचे क्षेत्र वाढवणे, हे या संघटनेचे लक्ष्य आहे. सध्या आयसीसीचे २५ देश हे एसीसीचे सदस्य आहेत.
हेही वाचा - विराटला आऊट करायचे कसे, इंग्लंड खेळाडूला पडला प्रश्न