ETV Bharat / sports

जसप्रीत बुमराहला या स्पोर्ट्स अँकरने केले 'क्लीन बोल्ड'! - जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन लग्न

संजना गणेशन ही मिस इंडिया स्पर्धेची सदस्य राहिली आहे. तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. संजनाने आयपीएल सामन्यांमध्येही काम केले आहे. भारतातील इतर अनेक सामनेदेखील तिने कव्हर केले आहेत. यादरम्यान दोघांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएल दरम्यान तिने 'केकेआर डायरी' देखील आयोजित केली होती.

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन बातमी
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन बातमी
author img

By

Published : Mar 9, 2021, 10:02 AM IST

Updated : Mar 9, 2021, 12:02 PM IST

गोवा - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली. बुमराहने लग्नाच्या कारणास्तव ही सुट्टी घेतल्याचे नंतर समोर आले होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध क्रीडा सादरकर्ती संजना गणेशनसोबत बुमराह विवाहबंधनात अडकणार आहे.

१४ ते १५ मार्चला हा विवाहसोहळा गोव्यात होणार आहे. बुमराहच्या लग्नाविषयी सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. बुमराहची पत्नी कोण असणार, यावरून अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र, सूत्रांच्या मते गोव्यात बुमराह बोहल्यावर चढणार आहे.

संजना गणेशन ही मिस इंडिया स्पर्धेची सदस्य राहिली आहे. तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. संजनाने आयपीएल सामन्यांमध्येही काम केले आहे. भारतातील इतर अनेक सामनेदेखील तिने कव्हर केले आहेत. यादरम्यान दोघांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएल दरम्यान तिने 'केकेआर डायरी' देखील आयोजित केली होती.

तर, जसप्रीत बुमराह दोन वर्षांपासून टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि तो या संघाचा स्टार खेळाडूदेखील आहे. भारत आणि इंग्लंड चौथ्या कसोटीपूर्वी बुमराहने सुट्टी घेतली. बीसीसीआयने ती मंजूर करताना त्याला रिलीज केले. याशिवाय त्याचा टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघात देखील समावेश नाही.

इतकेच नव्हे तर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत देखील खेळणार नसल्याचे वृत्त आहे. सुरूवातीला त्याच्या सुट्टी मागण्यामागे दुखापत किंवा कामाचा ताण हे कारण सांगितले जात होते. पण आता खरे कारण समोर आले आहे. जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार आहे. त्यासाठी त्याने ही सुट्टी घेतली आहे.

हेही वाचा - पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळात शिरला कोरोना!

Last Updated : Mar 9, 2021, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.