दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला झाला. या सामन्यात यंदाच्या आयपीएलमधील दुसरी सुपर ओव्हर अनुभवायला मिळाली. यामध्ये मुंबईने बंगळुरूला ८ धावांचे आव्हान दिले होते. अखेर बंगळुरूने धावा पूर्ण करून मुंबईवर विजय मिळवला. या पराभवासह बुमराहने एक विक्रम आपल्या नावावर केला.
सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहला बंगळुरूच्या फलंदाजांना रोखता आले नाही. बुमराहच्या सुपर ओव्हरनंतर मुंबईला पराभव मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २९ एप्रिल २०१७ रोजी बुमराहने गुजरात लायन्सविरूद्ध सुपर ओव्हरमध्ये ११ धावांचा बचाव केला. बुमराहने फिंच आणि ब्रॅंडन मॅक्युलमसमोर फक्त सहा धावा दिल्या. २९ एप्रिल २०१९रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यातही बुमराहने संघाला विजय मिळवून दिला होता. मुंबईने सुपर ओव्हरमध्ये तीन चेंडूंत नऊ धावा केल्या होत्या. तर, हैदराबादला बुमराहे आठ धावांत रोखले होते.
बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना अॅरोन फिंच (५२), देवदत्त पडिक्कल (५४), अब्राहम डिव्हिलियर्स (५५) यांच्या योगदानांमुळे २० षटकांत २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने ईशान किशन (९९) आणि कायरन पोलार्ड (नाबाद ६०) या फलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर बरोबरी साधली.