मँचेस्टर - ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणार्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने स्फोटक फलंदाज जेसन रॉयचा संघात समावेश केला आहे. डेव्हिड मलानला एकदिवसीय मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी ही माहिती दिली.
-
Welcome back @jasonroy20 💪
— England Cricket (@englandcricket) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Welcome back @jasonroy20 💪
— England Cricket (@englandcricket) September 9, 2020Welcome back @jasonroy20 💪
— England Cricket (@englandcricket) September 9, 2020
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत मलानने अव्वल स्थान राखले आहे. त्याने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १२९ धावा केल्या. शिवाय, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकाविजयात त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
इंग्लंडचा संघ - इयान मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, टॉम बंटन, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
राखीव - साकीब महमूद, डेव्हिड मलान, फिल सॉल्ट.
ऑस्ट्रेलियाचा संघ - अॅरॉन फिंच (कर्णधार), सीन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (उपकर्णधार), जोश हेझलवुड, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरिडथ, जोश फिलिप, डॅनियल सॅम्स, केन रिचर्ड्सन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, अँड्र्यू टाय, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.