ETV Bharat / sports

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार म्हणते, विराटच्या नव्हे तर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल

एका इन्स्टाग्राम व्हिडिओ चॅट दरम्यान जेमिमा रॉड्रिग्जला धोनी आणि कोहली यांच्यापैकी तुला कोणाच्या नेतृत्वात खेळायला आवडेल असे विचारले असता ती म्हणाली, 'महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल. त्याचा खेळ पाहून मी लहानाची मोठी झाली आणि धोनीने विश्वकरंडक स्पर्धेत नेतृत्वाचे कौशल्य दाखवून दिले आहे.'

'It's like a fantasy' - Indian women's team star Jemimah Rodrigues wants to play under MS Dhoni's captaincy
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार म्हणते, विराटच्या नव्हे तर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल
author img

By

Published : Apr 11, 2020, 8:35 PM IST

Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला, तुला विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळायला आवडेल की महेंद्रसिंह धोनीच्या, असे विचारले असता, तिने धोनीच्या नावाला पसंती दिली. जेमिमाने धोनीच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले आणि त्याचा खेळ पाहून लहानाची मोठी झाल्याचे तिने सांगितले.

एका इन्स्टाग्राम व्हिडिओ चॅट दरम्यान जेमिमाला धोनी आणि कोहली यांच्यापैकी तुला कोणाच्या नेतृत्वात खेळायला आवडेल असे विचारले असता ती म्हणाली, 'महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल. त्याचा खेळ पाहून मी लहानाची मोठी झाली आणि धोनीने विश्वकरंडक स्पर्धेत नेतृत्वाचे कौशल्य दाखवून दिले आहे.'

धोनी हा आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. धोनीने २०० एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले असून यातील ११० सामने भारताने जिंकले आहेत. तर ७४ सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे.

दरम्यान, महेंद्रसिंह धोनी इंग्लंड विश्वकरंडकापासून संघाबाहेर आहे. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यानंतर निवड समितीने धोनीला संघात जागा दिली नाही. धोनी आयपीएलच्या माध्यमातून टीम इंडियात परतण्यासाठी आतूर होता. पण कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा होणार की हे नाही, याबाबत कोणतेच ठोस निर्णय बीसीसीआयकडून अद्याप घेण्यात आलेले नाहीत. दरम्यानच्या काळात धोनी निवृत्ती स्वीकारणार, अशा चर्चांना ऊत आला आहे. पण धोनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा - ‘पांड्या ब्रदर्स’ना कोणी घडवलं?... कृणालने दिलं उत्तर

हेही वाचा - 'धोनी अद्भूत, टीम इंडियाला त्याच्यासारखा खेळाडू मिळणं कठीण, निवृत्तीसाठी दबाव टाकू नका'

Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.