ETV Bharat / sports

टीम इंडियाला मायदेशात पराभूत करणे, 'मुश्किल ही नही नामुमकिन' - टीम इंडियाचा मायदेशात रेकॉर्ड

फेब्रुवारी २०१० नंतर आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटीपर्यंत टीम इंडियाने एकूण ४६ कसोटी सामने खेळले आहेत. यात ३४ सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर ९ सामने ड्रॉ राहिले आहेत. महत्वाचे म्हणजे, टीम इंडियाला फक्त ३ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. या आकडेवारीवरून टीम इंडिया मायदेशात सरस असल्याचे दिसून येते.

टीम इंडियाला मायदेशात पराभूत करणे, 'मुश्किल ही नही नाामुमकिन है'
author img

By

Published : Oct 14, 2019, 11:46 AM IST

नवी दिल्ली - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणातालिकेत अव्वलस्थानी विराजमान असलेल्या टीम इंडियाचा मायदेशात पराभव करणे, मुश्किलही नही नामुमकिन असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. कारण टीम इंडियाने आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेसह मायदेशात तब्बल ११ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २०१२-१३ पासून टीम इंडियाने मालिका विजयाची लय कायम राखली आहे. यासह टीम इंडियाने मायदेशात फेब्रुवारी २०१० नंतर तब्बल ३४ कसोटी सामने जिंकले आहेत.

फेब्रुवारी २०१० नंतर आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटीपर्यंत टीम इंडियाने एकूण ४६ कसोटी सामने खेळले आहेत. यात ३४ सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर ९ सामने ड्रॉ राहिले आहेत. महत्वाचे म्हणजे, टीम इंडियाला फक्त ३ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. या आकडेवारीवरुन टीम इंडिया मायदेशात सरस असल्याचे दिसून येते.

टीम इंडिया
टीम इंडिया

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत विजयी आघाडी घेत ऑस्ट्रेलियाचा मायदेशात सर्वात जास्त मालिका जिंकण्याचा विक्रम मोडित काढला. ऑस्ट्रेलियाने सलग १० कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम टीम इंडियाने मोडित काढत विश्वविक्रम रचला. ऑस्ट्रेलियाने हा विक्रम १९९४-९५ ते २०००-०१ या काळादरम्यान केला. तसेच हाच विक्रम पुन्हा त्यांनी २००४ ते २००८-०९ दरम्यानही केला होता.

हेही वाचा - बीसीसीआयच्या अध्यक्षपदी ‘दादा’, गांगुली अमित शाहंच्या पुत्रासह सांभाळणार धुरा?

हेही वाचा - भीषण अपघातात ४ राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू, ३ गंभीर

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.