नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेनंतर, टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला रणजी सामन्यादरम्यान दुखापत झाली असून तो या दौऱ्यासाठी उपलब्ध असणार का? अशी शंका निर्माण झाली आहे.
हेही वाचा - १५ ते २० दिवसांसाठी द्रविड घेणार पांड्याचा क्लास!
विदर्भविरूद्धच्या रणजी सामन्यात इशांतच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. विदर्भविरुद्धच्या पहिल्या डावात इशांतने ४५ धावात ३ फलंदाजांना माघारी धाडले.
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाला दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. इशांत हा भारताच्या कसोटी संघातील महत्वाचा सदस्य असल्याने त्याची ही दुखापत भारताला महागात पडू शकते. कसोटी कारकिर्दीत इशांतने ९६ सामने खेळताना २९२ बळी घेतले आहेत.