ETV Bharat / sports

इशांत शर्मासह २९ खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस - Ishant sharma arjuna award news

इशांत शर्मा व्यतिरिक्त अतानू दास, दीपिका ठाकूर, दीपक हुडा, दिविज शरण, मीराबाई चानू, साक्षी मलिक आणि तीन पॅरालिम्पियन खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेंकीरेड्डी या जोडीचीही या पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे.

Ishant sharma among 29 athletes recommended for arjuna award
8466224
author img

By

Published : Aug 18, 2020, 5:38 PM IST

नवी दिल्ली - यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासह २९ खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. या खेळाडूंपैकी विजेत्यांची निवड केली जाईल. या खेळाडूंच्या निवडीसाठी १२ सदस्यीय निवड समितीची बैठक घेण्यात आली. सोमवारी द्रोणाचार्य आणि ध्यानचंद तर, मंगळवारी समितीने राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांची नावे जाहीर केली.

इशांत शर्मा व्यतिरिक्त अतानू दास, दीपिका ठाकूर, दीपक हुडा, दिविज शरण, मीराबाई चानू, साक्षी मलिक आणि तीन पॅरालिम्पियन खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेंकीरेड्डी या जोडीचीही या पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे.

  • Cricketer Ishant Sharma and archer Atanu Das among 29 sportspersons recommended for Arjuna award by sports ministry's selection committee

    — Press Trust of India (@PTI_News) August 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इशांत शर्माने ९७ कसोटी सामन्यात २९७ बळी घेतले असून यामध्ये ११ वेळा ५ बळींच्या कामगिरीचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इशांतने न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना खेळला होता. इशांतने ८० एकदिवसीय सामन्यात ११५ बळी मिळवले आहेत.

तर, भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. रोहितशिवाय, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थांगावेलू, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल या खेळाडूंचीही भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानासाठी शिफारस करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.