विजयवाडा - भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत जम्मू-काश्मीर विरुद्ध खेळताना धमाकेदार शतक ठोकले. यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून खेळताना ईशान अशी कामगिरी करणारा जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. सध्या तो झारखंड संघाकडून खेळत आहे. ईशानने ५५ चेंडूत १०० धावांची खेळी केली.
भारताच्या इतर कोणत्याही यष्टीरक्षक कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नाही. यापूर्वी दिनेश कार्तिकने कर्णधार म्हणून खेळताना नाबाद ९० धावांची खेळी केली. २०१० मध्ये त्याने तमिळनाडूच्या संघाकडून यष्टीरक्षक कर्णधार खेळताना केली. त्याचा हा विक्रम ईशान किशनने ९ वर्षानंतर मोडीत काढला.
या सामन्यात जम्मू काश्मीरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १६८ धावा केल्या. प्रतिउत्तरात झारखंडच्या संघाने १६.४ षटकात १ गड्याच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केले.