ETV Bharat / sports

इरफान पठाण लंकेत 'या' संघाकडून खेळणार - Irfan pathan play for kandy tuskers

इरफान म्हणाला, "मी यासाठी निश्चितच तयार आहे. होय, मी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतू मी जगभरात खेळू शकतो आणि आशा आहे, की मी माझ्या खेळाचा आनंद नक्कीच घेईल. मला वाटते की मी पूर्वीसारखे खेळू शकतो. पण मला हळू हळू सुरुवात करावी लागेल. ते कसे होते ते पाहूया, मग मी पुढे नेईन."

Irfan pathan will play for kandy tuskers in lpl
इरफान पठाण लंकेत 'या' संघाकडून खेळणार
author img

By

Published : Nov 1, 2020, 3:23 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) पहिल्या हंगामात कँडी टस्कर्सकडून खेळणार आहे. इरफान आणि टस्कर्सचे प्रशिक्षक हसन तिलकरत्ने यांनी या कराराची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे.

पठाण म्हणाला, "मी यासाठी निश्चितच तयार आहे. होय, मी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतू मी जगभरात खेळू शकतो आणि आशा आहे, की मी माझ्या खेळाचा आनंद नक्कीच घेईल. मला वाटते की मी पूर्वीसारखे खेळू शकतो. पण मला हळू हळू सुरुवात करावी लागेल. ते कसे होते ते पाहूया, मग मी पुढे नेईन."

यापूर्वी मनप्रीत गोनी आणि मनविंदर बिस्ला यांनी कोलंबो किंग्जशी करार केला होता. मात्र, स्पर्धेपूर्वी, बिस्लाने नाव मागे घेतले. बिस्ला व्यतिरिक्त, आंद्रे रसेल, फाफ डु प्लेसिस, डेव्हिड मिलर आणि डेव्हिड मलान यांनीही लीगमधून माघार घेतली आहे.

२१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत पालेकल आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम या दोन मैदानावर ही स्पर्धा खेळली जाईल. १५ दिवसांत एकूण २३ सामने खेळले जातील.

कारकीर्द -

इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स, एकदिवसीय मध्ये १५४४ धावा आणि १७३ विकेट्स आणि टी-२० मध्ये १७२ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.