नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय सर्व क्रिकेटच्या प्रकारांमधून निवृत्ती पत्करली आहे. इरफानने २००३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, तो २००६ मध्ये पाकिस्तान दौऱ्यात चर्चेत आला होता.
इरफान पठाणने २००६ मध्ये पाकिस्तानात हॅट्ट्रिक साधली होती. कराची येथे झालेल्या कसोटीत त्याने पाकिस्तान विरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता. या कामगिरीसह तो कसोटीत हरभजन सिंगनंतर हॅट्ट्रिक घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला.
-
Happy Birthday @IrfanPathan 🎂😎
— BCCI (@BCCI) October 27, 2018 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here's reliving his famous hat-trick against Pakistan. This one's from the archives #TeamIndia pic.twitter.com/CG3sV47aDU
">Happy Birthday @IrfanPathan 🎂😎
— BCCI (@BCCI) October 27, 2018
Here's reliving his famous hat-trick against Pakistan. This one's from the archives #TeamIndia pic.twitter.com/CG3sV47aDUHappy Birthday @IrfanPathan 🎂😎
— BCCI (@BCCI) October 27, 2018
Here's reliving his famous hat-trick against Pakistan. This one's from the archives #TeamIndia pic.twitter.com/CG3sV47aDU
तसेच इरफानने २००७ साली झालेल्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेत मोलाची भूमिका पार पाडली होती. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.
इरफानने भारताकडून २९ कसोटी खेळले आहे. यात त्याने फलंदाजीत १ शतक आणि ६ अर्धशतकांसह ११०५ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने १०० गडी बाद केले आहेत. कसोटीत इरफानचा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ५९ धावांत ७ गडी बाद असा आहे.
एकदिवसीय करियरमध्ये इरफानने १२० सामन्यात खेळताना १५४४ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत १७३ फलंदाजांना त्याने माघारी धाडले आहे. त्याने २४ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. यात त्याने १७२ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत २८ विकेटच्या त्याच्या नावे आहेत.
हेही वाचा - Breaking News : अष्टपैलू इरफान पठाणची अखेर निवृत्ती
हेही वाचा - सीएए कायद्यावर विराट कोहलीची प्रतिक्रिया, म्हणाला...