नागपुर - सध्या रणजी चॅम्पियन आणि शेष भारत यांच्यात इराणी चषक सुरू आहे. या सामन्यात विदर्भचा जादुई गोलंदाज अक्षय कर्णेवार चर्चेत आला आहे. या सामन्यात फलंदाजासाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो. आपल्या गोलंदाजीने त्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
#akshaykarnewarhttps://t.co/XNMN7biS4C
— GreatDingo (@GreatDingo007) February 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#akshaykarnewarhttps://t.co/XNMN7biS4C
— GreatDingo (@GreatDingo007) February 13, 2019#akshaykarnewarhttps://t.co/XNMN7biS4C
— GreatDingo (@GreatDingo007) February 13, 2019
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
डाव्या हाताने गोलंदाजी करणारा फिरकीपटू दोन्ही हाताने गोलंदाजी करून फलंदाजांना अडचणीत आणत आहे. फललंदाज त्याच्यापुढे धावा काढताना संघर्ष करताना दिसून येत आहेत. त्याच्या या गोलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्याच्या गोलंदाजीच्या शैलीविषयी बोलताना स्वतः अक्षय म्हणाला की, मी सामान्य फिरकी गोलंदाज आहे. मी दोन्ही हातांनी केवळ गोलंदाजी करतो असे नाही तर दोन्ही हातांनी सर्व कामे करतो. ते पाहून सारेच चकित होतात. काही वेळा संघात फिरकी गोलंदाज नसल्याने मी सतत गोलंदाजीचा सराव करायचो. त्यामुळे मला यश मिळत गेले. दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्यात कोणतीच अडचण येत नाही.