मुंबई - देशभरात आज गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचा आनंद मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सर्वांना गुढी पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंट्सवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात मुंबई इंडियन्सचे खेळाडू नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. गुढी पाडव्याच्या निमित्ताने, अनेकांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर कॅप्टन रोहित शर्माची कमेंट ठेवल्याचे दिसून आले. 'माझ्याकडून आणि मुंबई इंडियन्सकडून तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा', असे रोहितने यामध्ये म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी, यष्टिरक्षक आदित्य तरे, गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खान, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, अर्जुन तेंडुलकर यांच्यासोबतीला हार्दिक पांड्या यानेही मराठीतून आपल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना -
आयपीएल २०२१ मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. मुंबईचा संघ सलामीच्या सामन्यात बंगळुरूकडून पराभूत झाला आहे. ते विजयी लय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे कोलकाताने इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात बलाढ्य सनरायजर्स हैदराबादला नमवलं आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. उभय संघातील हा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होणार असून या सामन्याला ७ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - KKR VS MI : चेन्नईच्या मैदानावर मुंबईसमोर कोलकाताचे आव्हान
हेही वाचा - RR vs PBKS : ...माझ्याकडे शब्द नाहीत; पराभवानंतर संजूची प्रतिक्रिया