आबूधाबी - मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी जोरदार तयारी करत आहे. या तयारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सकडून शेअर केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. आता आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत गोलंदाज वेगवान चेंडू टाकत स्टंम्पचे तुकडे केल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईचा महत्वाचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएलमधून माघार घेतली. असे असले तरी मुंबई संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत. या वर्षी न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट मुंबईकडून खेळताना दिसेल. त्यामुळे मलिंगाची कमतरता जाणवणार नाही. बोल्टने संघासोबत सरावाला सुरूवात केली असून याचा व्हिडिओ मुंबईने शेअर केला आहे.
व्हिडिओत बोल्ट वेगवान चेंडू टाकत स्टंम्पचे दोन तुकडे केल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ शेअर करताना मुंबईने म्हटले आहे की, क्लिन बोल्ट, ट्रेट आला आहे.
-
⚡ Clean Boult! ⚡
— Mumbai Indians (@mipaltan) September 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Trent has arrived 🔥#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @trent_boult pic.twitter.com/oUw8YzeNdq
">⚡ Clean Boult! ⚡
— Mumbai Indians (@mipaltan) September 12, 2020
Trent has arrived 🔥#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @trent_boult pic.twitter.com/oUw8YzeNdq⚡ Clean Boult! ⚡
— Mumbai Indians (@mipaltan) September 12, 2020
Trent has arrived 🔥#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @trent_boult pic.twitter.com/oUw8YzeNdq
दरम्यान, बोल्ट मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचा हिस्सा होता. त्याने आतापर्यंत ३३ सामन्यात ३८ विकेट घेतल्या आहेत. गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार असून १९ सप्टेंबरला मुंबई चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.
मुंबईचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, केरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, ख्रिस लिन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, जेम्स पॅटिंन्सन (लसिथ मलिंगा च्या जागेवर ), राहुल चाहर, मिशेल मॅक्लेनाघन, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी, जयंत यादव, सौरभ तिवारी, ईशान किशन, नॅथन कूल्टर-नाइल, अनुकूल रॉय, आदित्य तरे, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय सिंह, शेरफेन रदरफोर्ड आणि अनमोलप्रीत सिंह.
हेही वाचा - IPL २०२० : रैनाच्या जागेवर मलान? चेन्नईचे CEO म्हणाले...
हेही वाचा - सीपीएल गाजवल्यानंतर पोलार्ड मुंबई संघात दाखल