ETV Bharat / sports

IPL 2020 : 'या' खेळाडूमुळे राजस्थानला सपोर्ट करायला सुरूवात केली - स्मृती मंधाना - संजू सॅमसन न्यूज

राजस्थानचा फलंदाज संजू सॅमसनच्या फलंदाजीवर स्मृती मंधाना फिदा झाली असून संजूमुळे ती राजस्थान रॉयल्स संघाला सपोर्ट करण्यास सुरूवात केली आहे.

IPL 2020: Smriti Mandhana names the cricketers shes cheering for in the tournament
PL 2020 : 'या' खेळाडूमुळे राजस्थानला सपोर्ट करायला सुरूवात केली - स्मृती मानधाना
author img

By

Published : Oct 1, 2020, 4:50 PM IST

Updated : Oct 1, 2020, 5:00 PM IST

मुंबई - राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२०मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी नोंदवली आहे. ते तीन सामन्यात दोन विजयासह चार गुणांची कमाई करत तिसऱ्या स्थानी आहेत. राजस्थानच्या दोन विजयात संजू सॅमसनने धडाकेबाज खेळी केल्या. यात त्याने दोन अर्धशतक झळकावले. संजूच्या या कामगिरीवर भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना चांगलीच प्रभावित झाली आहे. तिने संजूमुळे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.

स्मृती मंधानाने एका इंग्रजी माध्यमाला मुलाखत दिली. यात तिने सांगितले, की संजू सध्या आयपीएलमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. ते पाहायला मला खूप आवडते. त्यांच्या फलंदाजीची मी चाहती झाली आहे. त्याच्यामुळेच मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करायला लागली आहे.

संजू बेधडक ज्या पद्धतीने फटकेबाजी करतो ते पाहून, तो सध्या वेगळ्या दर्जाचा खेळ करतो आहे याची प्रचिती येते. मी सध्या आयपीएलमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांकडून सर्वकाही शिकून घ्यायचे ठरवले असल्याचेही स्मृतीने सांगितलं.

दरम्यान, आतापर्यंत तेराव्या हंगामात संजूने ३ सामन्यात दोन अर्धशतक झळकावली आहे. त्याने चेन्नईविरूद्धच्या सामन्यात ३२ चेंडूत १ चौकार आणि तब्बल ९ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह ८५ धावांची खेळी साकारली. मात्र तिसऱ्या सामन्यात कोलकाता विरोधात तो ८ धावांवर बाद झाला. या सामन्यात राजस्थानला पराभवाला सामोरे जावे लागले.

KKR vs RR: राजस्थानच्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा बदल; केकेआरची मुसंडी

IPL २०२० : मागील पराभव विसरून विजयासाठी मुंबई आणि पंजाब आतूर; कोण मारणार बाजी?

Last Updated : Oct 1, 2020, 5:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.