मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. पण बीसीसीआयने स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. शुक्रवारी वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं होतं. पण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. आता आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी वेळापत्रक उद्या (ता. ६, रविवार) जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं की, १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक उद्या (ता. ६ सप्टेंबर, रविवार) जाहीर करण्यात येणार आहे.
-
Schedule of IPL 2020 that starts from 19th September in UAE will be released tomorrow: IPL chairman Brijesh Patel pic.twitter.com/NHnGZzohQS
— ANI (@ANI) September 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Schedule of IPL 2020 that starts from 19th September in UAE will be released tomorrow: IPL chairman Brijesh Patel pic.twitter.com/NHnGZzohQS
— ANI (@ANI) September 5, 2020Schedule of IPL 2020 that starts from 19th September in UAE will be released tomorrow: IPL chairman Brijesh Patel pic.twitter.com/NHnGZzohQS
— ANI (@ANI) September 5, 2020
का होतोय वेळापत्रकासाठी उशीर -
आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यात बीसीसीआयला काही समस्या जाणवत आहेत. पहिली गोष्ट तर कोरोनाचे संकट. कोरोनामुळे युएई सरकारने वाहतुकीबाबत कडक नियमावली बनवली आहे. यात क्वारंटाइनचे नियम पाहता वेळापत्रकाचे नियोजन करणे, कठीण ठरत आहे. या कारणाने बीसीसीआय युएई सरकारशी बोलणी करत आहे. दुसरी समस्या म्हणजे, युएईमध्ये सध्याच्या घडीला उष्म वातावरण आहे. युएईमध्ये सर्वात जास्त उष्ण वातावरण हे अबूधाबी येथे आहे. त्यामुळे अबूधाबी येथे बीसीसीआयला जास्त सामने खेळवायचे नाहीत. कारण अबूधाबीला जास्त सामने खेळवले तर त्याचा विपरीत परिणाम खेळाडूंवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
पण, आता आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये आयपीएलच्या वेळापत्रकाची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, आयपीएलमधील काही खेळाडूंनी व्यक्तिगत कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. यात लसिथ मलिंगा, सुरेश रैना, केन रिचर्डसन, हरभजन सिंग या सारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएल स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच चेन्नईच्या १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर बीसीसीआयच्या मेडिकल टीममधील एक जण कोरोनाबाधित आढळला. यामुळे बीसीसीआय आवश्यक ती उपाययोजना, तातडीने करत आहे. याशिवाय फ्रेंचायझी आपापल्या खेळाडूंसाठी विविध उपाययोजना करत आहेत. यात फ्रेंचायझींनी खेळाडूंसाठी पीपीई कीट, मास्क, फेस शिल्ड आणि ग्लोव्हजही दिले आहेत.
हेही वाचा - कोरोनाची धास्ती : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसाठी तयार केली खास 'स्मार्ट रिंग'