ETV Bharat / sports

IPL २०२० : ६ सामने, ६ संघ आणि जागा ३; असे आहे आयपीएलच्या प्ले ऑफचे समीकरण - rajasthan defeat punjab NEWS

आयपीएलच्या १३व्या हंगामात आतापर्यंत ५० सामने झाले आहेत. आज ५१वा सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात खेळला जाणार आहे. बाद फेरीतील फक्त सहा सामने बाकी आहेत. तरी देखील अद्याप अंतिम चार संघ कोणते हे स्पष्ट झालेले नाही. मुंबई वगळता एकाही संघाचे क्वालिफायचे तिकीट पक्के झालेले नाही. अशातच सहा सामने, सहा संघ आणि तीन जागा, असे गणित सद्यघडीला आहे.

IPL 2020 : rajasthan defeat punjab made playoff even more exciting, next 6 match will decide top 4
IPL २०२०: ६ सामने ६ संघ आणि जागा ३; असे आहे आयपीएलच्या प्ले ऑफचे समिकरण
author img

By

Published : Oct 31, 2020, 2:11 PM IST

दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला, यानंतर मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरला. सीएसकेचा संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबई क्वालिफाय झाल्यामुळे आता उर्वरित तीन स्थानांसाठी सहा संघामध्ये चुरस आहे. त्यातच शुक्रवारी पंजाबचा राजस्थानने पराभव केला. पंजाबच्या या पराभवामुळे उर्वरित सर्वच संघांना प्ले ऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. पंजाबच्या पराभवाचा सर्वाधिक फायदा कोलकाता, राजस्थान आणि हैदराबाद या संघांना झाला आहे.

क्वालिफायचे तिकीट कोणाला?

आयपीएलच्या १३ व्या हंगामात आतापर्यंत ५० सामने झाले आहेत. आज ५१वा सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात खेळला जाणार आहे. बाद फेरीतील फक्त सहा सामने बाकी आहेत. तरी देखील अद्याप अंतिम चार संघ कोणते हे स्पष्ट झालेले नाही. मुंबई वगळता एकाही संघाचे क्वालिफायचे तिकिट पक्के झालेले नाही. अशातच सहा सामने, सहा संघ आणि तीन जागा असे गणित सद्यघडीला आहे.

...तर नेट रनरेटच्या आधारावर संघ ठरतील पात्र

पंजाब, राजस्थान, कोलकाता या संघाचे १३ सामन्याxत १२ गुण आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरच्या सामन्यात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आवश्यक आहे. हैदराबाद, दिल्ली, आरसीबी आणि मुंबई यांचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हैदराबादला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागेल. तर दिल्ली आणि आरसीबीला एका सामन्यात विजय अनिवार्य आहे. अन्यथा नेट रन रेटच्या आधारावर अंतिम चार स्थानांसाठी संघ क्वालिफाय होऊ शकतो.

मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल -

मुंबई संघाने १२ सामन्यांत ८ विजय मिळवले आहेत. तर ४ सामन्यांत त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. ते १६ गुणांसह प्ले ऑफ फेरीसाठी पात्र ठरले आहेत. राहिलेल्या २ सामन्यात विजय मिळवून ते गुणतालिकेत अव्वलस्थान कायम राखत, थाटात प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असतील.

राहिलेले सहा सामने -

  • दिल्ली विरुद्ध मुंबई
  • आरसीबी विरुद्ध हैदराबाद
  • चेन्नई विरुद्ध पंजाब
  • कोलकाता विरुद्ध राजस्थान
  • दिल्ली विरुद्ध आरसीबी
  • मुंबई विरुद्ध हैदराबाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.