ETV Bharat / sports

IPL २०२० : कोलकातासाठी प्ले-ऑफचा रस्ता खडतर; 'या' आहेत शक्यता - आयपीएल प्ले ऑफ न्यूज

मुंबई वगळता अन्य कोणताच संघ प्ले ऑफमध्ये पोहोचलेला नाही. बंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद हे संघ शर्यतीत आहेत. आज मुंबईनंतर दिल्ली आणि बंगळुरू यांच्यातील एक संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल. या शर्यतीत कोलकाता देखील टिकून आहे. पण त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागत आहे. कोलकाताला प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी कोणते समीकरण जुळून यावे लागेल, पाहा...

ipl 2020 possibilities for kkr to qualify for playoffs
IPL २०२० : कोलकातासाठी प्ले-ऑफचा रस्ता खडतर; 'या' आहेत शक्यता
author img

By

Published : Nov 2, 2020, 1:02 PM IST

दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील साखळी फेरीचे फक्त दोन सामने शिल्लक आहेत. तरीदेखील अद्याप मुंबई वगळता अन्य कोणताच संघ प्ले ऑफमध्ये पोहोचलेला नाही. बंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद हे संघ शर्यतीत आहेत. आज मुंबईनंतर दिल्ली आणि बंगळुरू यांच्यातील एक संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल. या शर्यतीत कोलकाता देखील टिकून आहे. पण त्यांना इतर संघांच्या जय-पराजयावर अवलंबून राहावे लागत आहे. कोलकाताला प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी कोणते समीकरण जुळून यावे लागेल, पाहा...

कोलकाताने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून दोन गुणांची कमाई केली. त्यांचे १४ सामन्यांत १४ गुण झाले असून गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. असे असले तरीही त्यांचे प्ले-ऑफमधले स्थान अद्याप निश्चित नाही.

असे आहे समीकरण -

आज दिल्ली विरुद्ध बंगळुरू या सामन्यात बंगळुरूचा संघ २२ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभूत झाला, किंवा दिल्लीचा संघ १८ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभूत झाला तरच कोलकाताचा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होऊ शकतो. या दोन्ही शक्यतांशिवाय सामन्याचा निकाल अखेरच्या षटकांत लागला तर, दिल्ली आणि बंगळुरु हे दोन्ही संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होतील. असे झाल्यास यानंतर कोलकाताला ३ तारखेच्या सामन्यात मुंबईने हैदराबादवर मात करणे गरजेचे ठरणार आहे.

असा रंगला सामना -

कर्णधार इयॉन मॉर्गनचे नाबाद अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने महत्वाच्या सामन्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली. १९२ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाच्या फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला. जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज आश्वासक खेळी करू शकला नाही. केकेआरने हा सामना ६० धावांनी जिंकला. केकेआरकडून पॅट कमिन्सने ४, शिवम मवी आणि वरुण चक्रवर्तीने २-२ तर कमलेश नागरकोटीने १ बळी घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.