दुबई - मुंबई इंडियन्सने रविवारी झालेल्या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ५ गडी राखून पराभव केला. दिल्ली या सामन्याआधी गुणतालिकेत अव्वलस्थानी होती. पराभवानंतर दिल्लीने अव्वलस्थान गमावले आहे. पाहा काय बदल झाले गुणतालिकेत...
मुंबई विरुद्ध दिल्ली या सामन्याआधी मुंबईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. मुंबईने या सामन्याआधी खेळलेल्या सहा सामन्यामध्ये चार विजय मिळवले होते, तर दोन पराभव त्यांना पत्करावे लागले होते. त्यामुळे मुंबईचे आठ गुण होते. पण दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यावर मुंबईच्या संघाने १० गुण झाले आहेत, दिल्लीच्या संघाचेही समान १० गुण असले तरी चांगल्या धावगतीच्या जोरावर मुंबईने अव्वल स्थान पटकावले आहे.
मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ हा १० गुणांसह अव्वल स्थानावर होता. कारण या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने सहा सामन्यांमध्ये पाच विजय मिळवले होते, तर त्यांना एका सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण मुंबईने त्यांना पराभवाचा धक्का देत दोन गुणांची कमाई केली. मुंबई आणि दिल्लीचे समान १० गुण आहेत. पण चांगल्या रनरेटच्या जोरावर मुंबईच्या संघाने अव्वल स्थान पटकावले असून दिल्लीच्या संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
दरम्यान, गुणतालिकेत मुंबई पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद आहे. राजस्थान सहाव्या स्थानी असून सातव्या स्थानावर धोनीचा चेन्नई संघ आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ तळाशी म्हणजे आठव्या स्थानावर आहे.