ETV Bharat / sports

IPL २०२० : दिल्लीचा मुंबईला धक्का; गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान, जाणून घ्या नवे बदल - Points Table IPL 2020

दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले, पाहा...

IPL 2020 Points Table: Delhi Capital climb to top spot after 13-run win over Rajasthan Royals
IPL २०२० : दिल्लीचा मुंबईला धक्का; गुणतालिकेत पटकावले अव्वलस्थान, जाणून घ्या नवे बदल
author img

By

Published : Oct 15, 2020, 3:40 PM IST

दुबई - दिल्ली कॅपिटल्सने काल (बुधवार) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी विजय मिळवला. त्यांचा हा स्पर्धेतील ६वा विजय ठरला. या विजयासह दिल्लीने मुंबईला गुणतालिकेत मोठा धक्का दिला. त्यांनी गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केलं आहे. दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले, पाहा...

दिल्ली विरुद्ध राजस्थान या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमाकांवर होता. त्यांनी राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी सात सामने खेळली होती. यात दिल्लीने पाच विजय मिळवले होते, तर त्यांना दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. पण राजस्थानचा पराभव करत दिल्लीने आपल्या सहाव्या विजयाची नोंद केली. या विजयासह दिल्लीला दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे दिल्लीने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला मागे सारत अव्वलक्रमांक पटकावले.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघाने आपल्या सात सामन्यात तीन विजय मिळवले होते, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थानला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता आठ सामन्यांमध्ये राजस्थानचे पाच पराभव झाले आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. या पराभवानंतरही गुणतालिकेत त्यांचे सातवे स्थान कायम राहिले.

दरम्यान, सध्याच्या घडीला गुणतालिकेत दिल्ली पहिल्या स्थानावर आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे बंगळुरू आणि कोलकाताचा संघ कायम आहे. हैदराबादचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे, तर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ हा सहाव्या स्थानावर आहे. सातव्या स्थानावर राजस्थान आहे. तर तळाशी पंजाबचा संघ आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.