ETV Bharat / sports

पंजाबच्या कर्णधाराकडे 'ऑरेंज कॅप', विराटची तिसऱ्या स्थानी झेप

author img

By

Published : Oct 27, 2020, 5:36 PM IST

चालू हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १२ सामन्यांत ५९५ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात ११ सामन्यात ४७१ धावा आहे. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली ११ सामन्यात ४१५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ipl 2020 orange cap and purple cap holders
पंजाबच्या कर्णधाराकडे 'ऑरेंज कॅप', विराटची तिसऱ्या स्थानी झेप

नवी दिल्ली - आयपीएलच्या ४६व्या सामन्यानंतर लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत:कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.

चालू हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १२ सामन्यांत ५९५ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात ११ सामन्यात ४७१ धावा आहे. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली ११ सामन्यात ४१५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. रबाडाने ११ सामन्यांमध्ये एकूण २३ बळी घेतले आहेत. त्यानंतर या यादीत पंजाबचा मोहम्मद शमी आहे. त्याच्या खात्यात २० बळी आहेत. राजस्थानच्या जोफ्रा आर्चरनेही १२ सामन्यांत १७ बळी घेतले आहेत.

गुणतालिकेची सद्यस्थिती -

सद्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स या संघाने गुणतालिकेतील आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ यावेळी तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानी पंजाब पोहोचला आहे. तर कोलकाताची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. सहाव्या आणि सातव्या स्थानावर अनुक्रमे राजस्थान आणि हैदराबाद आहे. धोनीचा चेन्नई संघ तळाशी म्हणजे आठव्या स्थानावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.