नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्ह पंजाबला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र, संघाचा कर्णधार लोकेश राहुल खोऱ्याने धावा करतो आहे. आयपीएलच्या २५व्या सामन्यानंतर लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत: कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
चालू हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने सात सामन्यांत ३८७ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर मयंक अग्रवाल असून त्याच्या खात्यात ३३७ धावा आहे. पंजाबने सात सामन्यात सहा पराभव पत्करले आहेत.
तर, रबाडाने पाच सामन्यांमध्ये एकूण १५ बळी घेतले आहेत. या यादीत मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ११ बळी घेऊन दुसर्या स्थानावर आहे. मुंबईचा ट्रेंट बोल्ट १० बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर, दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या तर, पंजाबचा संघ २ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहेत.