अबुधाबी - कोलकाता नाइट रायडर्सच्या वरूण चक्रवर्तीने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात शानदार प्रदर्शन केले. वरूणच्या फिरकीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ २० षटकात ९ बाद १३५ धावांच करू शकला. कोलकातासाठी हा महत्वाचा सामना होता. यात त्यांनी ५९ धावांनी विजय मिळवला. यात वरूणने २० धावात ५ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कोण आहे वरूण चक्रवर्ती वाचा..
वरूण एक फ्री लान्सर आर्किटेक आहे. आयपीएलमध्ये त्यांची एन्ट्री त्याच्या मिस्ट्री बॉलिंगमुळे झाली. कारण वरूणने, चेंडू सात प्रकारे फेकू शकतो, असा दावा केला होता. यात ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉप स्पिन, पायावर यॉर्कर आपण सहजपणे फेकू शकतो, असे त्याने सांगितले. २०१९च्या हंगामात पंजाबने वरूणला ८.४ कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले होते.
पण आयपीएलमध्ये वरूणला भाग्याची साथ मिळाली नाही. त्याला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने ३५ धावात १ गडी टिपला. दुखापतीमुळे वरूण २०१९च्या हंगामात खेळू शकला नाही. यानंतर २०२०च्या हंगामात कोलकाताने ४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले.
वरूणने कोलकाताकडून १३वा हंगाम खेळताना, १० सामने खेळली आहेत. यात त्याने १२ गड्यांना तंबूत धाडलं आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन नोंदवले.
हेही वाचा - KKR vs DC : चक्रवर्ती-कमिन्सच्या माऱ्यासमोर दिल्ली नेस्तनाबूत, कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान कायम
हेही वाचा - IPL २०२० : धोनीसाठी सन्मानाची लढत, समोर आहे आरसीबीचे 'विराट' आव्हान