दुबई - कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जात आहे. या स्पर्धेत सर्व संघाचे ७ सामने झाले आहेत. यात मुंबईने सर्वाधिक १० गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरू आणि कोलकाता अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे. हैदराबाद, राजस्थान, चेन्नई आणि पंजाब हे संघ उलटफेर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशात आजपासून मिड सिझन ट्रान्सफर ही सुविधा खुली झाली आहे.
या सुविधेतून संघांना खेळाडूंची अदला-बदल करता येणार आहे. पण, यासाठी काही नियम आहेत. त्यात प्रामुख्याने, खेळाडूंच्या अदलाबदलीसाठी दोन्ही संघाची संमती असणे आवश्यक आहे. तसेच लीगच्या मध्यंतरापर्यंत त्या खेळाडूने दोनपेक्षा अधिक सामने खेळलेले नसावेत. असे अदला-बदल करता येणारे खेळाडू, प्रत्येक संघात कोणते आहेत ते वाचा...
- मुंबई इंडियन्स - ख्रिस लीन, नॅथन कोल्टर नील, आदित्य तरे, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, जयंत यादव, शेर्फान रुथरफोर्ड, मिचेल मॅक्लेघन, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख आणि प्रिन्स बलवंत राय.
- कोलकाता नाइट रायडर्स - टॉम बँटन, रिंकू सिंग, संदीप वॉरियर्स, सिद्धेश लाड, ख्रिस ग्रीन, प्रसिद्ध कृष्णा, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक.
- चेन्नई सुपर किंग्ज - केएम आसीफ, इम्रान ताहीर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, आर साई किशोर आणि जोश हेझलवूड.
- दिल्ली कॅपिटल्स - अजिंक्य रहाणे, आवेश खान, किमो पॉल, संदीप लामीच्छाने, अॅलेक्स कॅरी, ललित यादव, डॅनिएल सॅम्स, तुषार देशपांडे आणि मोहित शर्मा.
- किंग्ज इलेव्हन पंजाब - अर्षदीप सिंग, दर्शन नळखांडे, कृष्णप्पा गोवथम, हार्डस विलजोईन, ख्रिस गेल, हरप्रीत ब्रार, जगदिश सुचिथ, मनदीप सिंग, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, दीपक हुडा, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, सिमरन सिंग आणि तजींदर सिंग.
- सनरायझर्स हैदराबाद - बसील थम्पी, बिली स्टँनलेक, मोहम्मद नबी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, वृद्धीमान साहा, विजय शंकर आणि विराट सिंग.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - मोइन अली, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, गुरकिरत सिंग मान, डेल स्टेन, शाहबाज अहमद, पवन देशपांडे आणि अॅडम झम्पा.
- राजस्थान रॉयल्स - मयांक मार्कंडे, अंकित राजपूत, मनन वोहरा, महिपाल लोमरोर, शंशांक सिंग, वरूण आरोन, कार्तिक त्यागी, ओशाने थॉमस, अनिरुद्ध जोशी, अँण्ड्रू टाय, आकाश सिंग आणि अनुज रावत.