दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला झाला. या सामन्यात यंदाच्या आयपीएलमधील दुसरी सुपर ओव्हर अनुभवायला मिळाली. यामध्ये मुंबईने बंगळुरूला ८ धावांचं आव्हान दिलं होतं. अखेर बंगळुरूने धावा पूर्ण करून मुंबईवर विजय मिळवला.
बंगळुरुने दिलेल्या २०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची वाईट सुरुवात झाली. मुंबईने ५० धावांच्या आतच महत्त्वाचे ३ फलंदाज गमावले. यात क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माचा समावेश होता. मागच्या सामन्यात ८० धावांची खेळी करणारा रोहित या सामन्यात केवळ ८ धावाच करू शकला. वॉशिंग्टन सुंदरने त्याला बाद केले. हे ३ फलंदाज बाद झाल्यानंतर या हंगामात पहिल्यांदा संधी मिळालेल्या ईशान किशानने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्याने केरॉन पोलार्डच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढवली. ईशानने ५८ चेंडूंत ९९ धावांची खेळी साकारली. या खेळीत २ चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांचा समावेश होता, तर पोलार्डने २४ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६० धावांची खेळी केली. या दोघांमुळे मुंबईच्या धावसंख्येला बंगळुरूच्या धावसंख्येशी बरोबरी साधता आली. बंगळुरूकडून आज पदार्पण केलेल्या इसुरू उडानाने ४ षटकांत ४५ धावा देत २ बळी घेतले, तर वॉशिंग्टन सुंदर, युझर्वेंद्र चहल आणि अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून मुंबईने बंगळुरुला फलंदाजीचे आमंत्रण दिले. अॅरोन फिंच-देवदत्त पडीक्कल या सलामीवीरांची अर्धशतके आणि एबी डिव्हिलियर्स-शिवम दुबेच्या शेवटच्या षटकांतील फटकेबाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईसमोर २० षटकात ३ बाद २०१ धावा ठोकल्या. नाणेफेक गमावून मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना चांगलेच नाचवले. फिंचने डावाची आक्रमक सुरुवात केली. त्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर पडीक्कल-एबीने मोर्चा सांभाळला. एका बाजूला पडीक्कल बेधुंद फटकेबाजी करत होता, तर डिव्हिलियर्स खराब चेंडूंना स्टॅन्ड्समध्ये पोहोचवत होता. पडीक्कल ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावांवर तंबूत परतला. दोन्ही सलामीवीरांना बोल्टने बाद केले. त्यानंतर आलेला विराटही ११ चेंडूत ३ धावा करत माघारी फिरला. फिरकीपटू राहुल चहरने विराटला बाद केले.
त्यानंतर, डिव्हिलियर्सने शिवम दुबेला साथीला घेत धावफलक हलता ठेवला. डिव्हिलियर्स आणि दुबेच्या जोडीने मुंबईच्या पॅटिन्सन आणि बुमराहच्या गोलंदाजीला चोख उत्तर दिले. पॅटिन्सनच्या चार षटकात ५१ तर, बुमराहला ४२ धावा चोपल्या गेल्या. शिवम दुबेने १० चेंडूत ३ षटकार आणि एका चौकारासह २७ धावांची झटपट आणि नाबाद खेळी केली. तर, डिव्हिलियर्स २४ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५५ धावांवर नाबाद राहिला.
LIVE UPDATE
- सुपर ओव्हरमध्ये बंगळुरू विजयी
- सुपर ओव्हरमध्ये मुंबईचे बंगळुरुला ८ धावांचे आव्हान
- समान धावसंख्येमुळे सुपर ओव्हर
- पोलार्डच्या चौकारनंतर मुंबईच्या २०१ धावा
- ईशान किशान ५८ चेंडूत ९९ धावा काढून बाद
- १९ षटकांनंतर मुंबईच्या ४ बाद १८३ धावा
- ईशान किशान ७० तर पोलार्ड धावांवर ३५नाबाद.
- १७ षटकानंतर मुंबईच्या ४ बाद १४९ धावा.
- शेवटच्या षटकांत पोलार्डची फटकेबाजी
- मुंबईला ३० चेंडूत ९० धावांची गरज.
- १५ षटकानंतर मुंबईच्या ४ बाद ११२ धावा.
- ईशान किशनचे अर्धशतक.
- केरॉन पोलार्ड मैदानात.
- हार्दिक पांड्या १५ धावांवर बाद, झम्पाने केले बाद.
- मुंबईला विजयासाठी ६० चेंडूत १३९ धावांची गरज.
- दहा षटकानंतर मुंबईच्या ३ बाद ६३ धावा.
- सात षटकानंतर मुंबईच्या ३ बाद ४१ धावा.
- हार्दिक पांड्या मैदानात.
- मुंबईचे ५० धावांच्या आत ३ फलंदाज बाद.
- क्विंटन डी कॉक १४ धावांवर बाद, चहलला मिळाली विकेट.
- चार षटकानंतर मुंबईच्या २ बाद २४ धावा.
- ईशान किशन मैदानात.
- मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार शून्यावर माघारी. उडानाने केले बाद.
- सूर्यकुमार यादव मैदानात.
- वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर नेगीने घेतला रोहितचा झेल.
- रोहित शर्मा ८ धावांवर बाद.
- पहिल्या षटकात मुंबईच्या बिनबाद १४ धावा.
- रोहितच्या बॅटमधून मुंबईच्या डावाचा पहिला षटकार.
- पदार्पणवीर इसुरू उडाना टाकतोय बंगळुरूसाठी पहिले षटक.
- मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक मैदानात.
- विराटसेनेचे मुंबईला २०२ धावांचे आव्हान
- बंगळुरूच्या २० षटकात ३ बाद २०१ धावा.
- शेवटच्या षटकात शिवम दुबेची फटकेबाजी.
- डिव्हिलियर्सचे २३ चेंडूत अर्धशतक, खेळीत ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश.
- एबी डिव्हिलियर्सची शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी.
- १८ षटकानंतर बंगळुरूच्या ३ बाद १६४ धावा.
- शिवम दुबे मैदानात.
- देवदत्त पडीक्कल ५४ धावांवर बाद, बोल्टने धाडले माघारी.
- देवदत्तच्या खेळीत ५ चौकार, २ षटकारांचा समावेश.
- देवदत्त पडीक्कलचे अर्धशतक. तिसऱ्या सामन्यात दुसरे अर्धशतक.
- १५ षटकानंतर बंगळुरूच्या २ बाद १२३ धावा.
- १४व्या षटकात पॅटिन्सनला देवदत्तचे लागोपाठ दोन षटकार.
- बंगळुरूच्या धावसंख्येला लगाम घालण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश.
- मिस्टर ३६० डिग्री मैदानात.
- विराट पुन्हा अपयशी, ११ चेंडूत ३ धावांवर चहरने केले बाद.
- दहा षटकानंतर बंगळुरूच्या १ बाद ८५ धावा.
- विराट कोहली मैदानात.
- देवदत्त पडीक्कल २३ धावांवर नाबाद.
- बोल्टने पोलार्डकरवी फिंचला केले झेलबाद, फिंचच्या ५२ धावा.
- बंगळुरूला पहिला धक्का, फिंच माघारी.
- फिंचचे ३१ चेंडूत अर्धशतक. खेळीत ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- बुमराहच्या पहिल्या षटकाला सुरुवात.
- फिंचच्या २३ चेंडूत नाबाद ४० धावा. खेळीत एक षटकार आणि ५ चौकारांचा समावेश.
- पाच षटकानंतर बंगळुरूच्या बिनबाद ४९ धावा.
- फिंचची आक्रमक सुरुवात. पाचव्या षटकात चहरला लागोपाठ तीन चौकार.
- फिंचकडून बंगळुरूच्या डावाचा पहिला षटकार.
- पहिल्या षटकात बंगळुरूच्या बिनबाद ८ धावा.
- देवदत्त पडीक्कलकडून बंगळुरूच्या डावाचा पहिला चौकार.
- ट्रेंट बोल्ट टाकतोय मुंबईसाठी पहिले षटक.
- बंगळुरूचे सलामीवीर अॅरोन फिंच आणि देवदत्त पडीक्कल मैदानात.
- नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग XI -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव आणि ट्रेंट बोल्ट.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग XI -
अॅरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली (कर्णधार), गुरकीरत मान, एबी डिव्हिलियर्स, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, अॅडम झम्पा, इसुरू उडाना.