दुबई - किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या शनिवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब या संघाने हैदराबादवर १२ धावांनी मात केली. पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १२७ धावांचे आवाहन दिले होते. मात्र, तरी देखील हैदराबादच्या संघाला पंजाबवर मात करता आली नाही. हैदराबादचा पूर्ण संघ १९.४ षटकांत ११४ धावा करुन बाद झाला. हैदराबादकडून फलंदाजी करताना डेव्हिड वार्नरने २० चेंडूंत ३५ २ षटकार आणि ३ चौकारांसह धावा केल्या. तर विजय शंकर याने २७ चेंडूंत २६ धावा केल्या.
त्यासोबत जॉनी बेअरस्टॉ याने १९, मनीष पांडे १५, तर अब्दुल समद याने ७, जेसन होल्डर याने ५ धावा केल्या. तर रशीद खान, संदीप वर्मा, खलील अहमद आणि थंगरसु नटराजन यांना भोपळाही फोडता आला नाही. यामुळे हैदराबादचा संघ १९.५ षटकात ११४ धावांपर्यंतच पोहोचू शकला. याप्रकारे पंजाबच्या संघाने हैदराबादवर १२ धावांनी मात करत स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला.
पंजाबकडून गोलंदाजी करताना, अर्शदीप सिंह आमि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. तर त्यासोबत मोहम्मद शमी, मुरुगन अश्वि, रवि बिश्नोईने प्रत्येकी १ बळी मिळवला.
दरम्यान, गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला २० षटकात १२६ धावांवर रोखले. ही धावसंख्या गाठताना पंजाबने आपले ७ फलंदाज गमावले. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने मयांक अग्रवालला विश्रांती देऊन मनदीप सिंहला सलामीला पाठवले. कर्णधार लोकेश राहुल आणि मनदीपने ३७ धावांची सलामी दिली. संदीप शर्माने मनदीपला १७ धावांवर बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. तर, फिरकीपटू राशिद खानने अप्रतिम गुगली टाकत २७ धावांवर राहुलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या गेलने २० धावांची खेळी केली. गेल बाद झाल्यावर निकोलस पूरनने संघाची धावगती वाढवली. पूरनने २ चौकारांसह नाबाद ३२ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या सव्वाशेपर्यंत पोहोचवली. हैदराबादकडून संदीप शर्मा, राशिद खान, जेसन होल्डर यांना प्रत्येकी २ बळी घेता आले. दोन्ही संघांचे प्रत्येकी १० सामन्यांतून ८ गुण असल्याने बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक होते. यात पंजाबने बाजी मारली.
LIVE UPDATE :
- पंजाबचा हैदराबादवर १२ धावांनी विजय
- १९.५ षटकांत हैदराबाद सर्वबाद ११४ धावा.
- शेवटच्या षटकांत हैदराबादला विजयासाठी १४ धावांची गरज
- १८ षटकानंतर हैदराबादच्या ५ बाद ११०
- १३ षटकानंतर हैदराबादच्या ३ बाद ७९ धावा.
- ९ षटकानंतर हैदराबादच्या ३ बाद ६७ धावा.
- हैदराबादला तिसरा धक्का, शमीच्या गोलंदाजीवर समद बाद.
- अश्विनने उडवला बेअरस्टोचा त्रिफळा, खेळीत १९ धावा.
- मनीष पांडे मैदानात.
- रवी बिश्नोईने वॉर्नरला केले बाद.
- हैदराबादला पहिला धक्का, वॉर्नर ३५ धावांवर माघारी.
- पाच षटकात हैदराबादच्या बिनबाद ४४ धावा.
- पहिल्या षटकात हैदराबादच्या बिनबाद ११ धावा.
- मोहम्मद शमीकडून पंजाबचे पहिले षटक.
- हैदराबादचे सलामीवीर मैदानात.
- २० षटकात पंजाबच्या ७ बाद १२६ धावा.
- निकोलस पूरन ३२ धावांवर नाबाद.
- रवी बिश्नोई मैदानात.
- मुरुगन अश्विन धावबाद.
- मुरुगन अश्विन मैदानात.
- ख्रिस जॉर्डन ७ धावांवर बाद, होल्डरचा दुसरा बळी.
- १६ षटकानंतर पूरन १० तर, जॉर्डन ३ धावांवर नाबाद.
- पंजाबच्या १५ षटकात ५ बाद ८८ धावा.
- ख्रिस जॉर्डन मैदानात.
- राशिद खानच्या गोलंदाजीवर दीपक हुडा शून्यावर बाद.
- मॅक्सवेल १२ धावांवर बाद, संदीप शर्माचा दुसरा बळी.
- मॅक्सवेल-पूरनची जोडी मैदानात.
- राशिदचा धमाका, २७ धावांवर राहुलचा उडवला त्रिफळा.
- दहा षटकानंतर पंजाबच्या २ बाद ६६ धावा.
- गेल २० धावांवर झेलबाद, होल्डरचा पहिला बळी.
- आठ षटकानंतर गेल १७ तर राहुल २५ धावांवर नाबाद.
- पाच षटकानंतर पंजाबच्या १ बाद ३७ धावा.
- ख्रिस गेल मैदानात.
- संदीप शर्माच्या गोलंदाजीवर मनदीप बाद.
- पंजाबला पहिला धक्का, मनदीप १७ धावांवर बाद.
- चार षटकानंतर पंजाबच्या बिनबाद २४ धावा.
- पहिल्या षटकात पंजाबच्या बिनबाद ५ धावा.
- संदीप शर्मा टाकतोय पहिले षटक.
- पंजाबचे सलामीवीर राहुल-मनदीप मैदानात.
- नाणेफेक जिंकून हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
सनरायझर्स हैदराबादचा संघ -
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, प्रियांम गर्ग, अब्दुल समद, विजय शंकर, राशिद खान, जेसन होल्डर, संदीप शर्मा, खलील अहमद, टी. नटराजन.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ -
केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, मनदीप सिंग, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, ख्रिस जॉर्डन.