शारजाह - आयपीएलमध्ये काल रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने पंजाबच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करत मोठा विजय साकारला. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर अशक्यप्राय वाटणारे आव्हान राहुल तेवतियाच्या वादळी खेळीमुळे सोपे झाले. प्रत्येक षटकात १४ धावांची गरज असताना त्याने अवघ्या १२ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. डावाची सुरुवात संंथ गतीने करणाऱ्या तेवतियाने पंजाबच्या शेल्डन कॉटरेलला एका षटकात पाच षटकार ठोकण्याची किमया केली.
सामन्यानंतर तेवतिया म्हणाला, ''प्रशिक्षकांनी मला लेग स्पिनरच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्यासाठी पाठवले होते. पण दुर्देवाने त्या षटकात मला मोठे फटके लगावता आले नाहीत. त्याऐवजी मी दुसऱ्याची गोलंदाजी फोडून काढली. मला पहिले २० चेंडू नीट खेळता आले नाहीत. पण मला आत्मविश्वास होता. मी जेव्हा डग-आऊटकडे पाहत होतो, तेव्हा मला सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती. त्यांना मी चेंडू टोलावू शकतो, याची खात्री होती. त्यानंतर मला सूर गवसला.''
- ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>
शारजाहच्या मैदानावर हा सामना झाला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मयांक अग्रवालचे शतक आणि केएल राहुलचे अर्धशतक यांच्या जोरावर २२३ धावा जमवल्या. हे आव्हान राजस्थानने ४ गडी राखून पूर्ण केले. तेवतियाने शेल्डन कॉटरेलने टाकलेल्या १८व्या षटकात ५ षटकार खेचत सामना राजस्थानच्या बाजूने फिरवला. मोहम्मद शमीच्या १९व्या षटकात राहुल तेवतिया ५३ धावांवर बाद झाला, पण तो पर्यंत विजय राजस्थानच्या आवाक्यात आला होता. त्यानंतर टॉम करन आणि जोफ्रा ऑर्चर यांनी राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
IPL २०२० : गुणातालिकेत राजस्थानची 'रॉयल' उडी, पाहा काय झाले बदल...
IPL २०२० : तेवतियाचे एका षटकातील ५ षटकार पाहून युवराज म्हणाला... VIDEO