दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्यात विराटची आरसीबी दुसऱ्या तर किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपल्या पहिल्या विजयासाठी जोर लावेल.
आरसीबीने सनरायझर्स हैदारबादचा १० धावांनी पराभव करत स्पर्धेची सुरूवात केली होती. तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध पराभूत झाला होता.
आरसीबीकडून देवदत्त पडीक्कलने पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावत आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केले. त्यासोबत एबी डिव्हीलिअर्सच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. कर्णधार विराट कोहली, अॅरोन फिंच हेही मोठी खेळी करण्यासाठी प्रयत्न करतील. गोलंदाजीत युजवेंद्र चहलची भूमिका महत्वाची ठरणार आहेत. उमेश यादव पहिल्या सामन्यात महागडा ठरला. यामुळे त्याच्या जागेवर अष्टपैलू मोहम्मद सिराजला मैदानात उतरवण्याचा विचार आरसीबी व्यवस्थापन नक्कीच करेल. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली अंतिम संघात कोणत्या स्थानावर येईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचा मयांक अग्रवाल सद्या सुसाट फॉर्मात आहे. कर्णधार के एल राहुल, ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरमन यांना चांगली कामगिरी करावी लागेल. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अष्टपैलू जेम्स निशाम यांची अंतिम संघात वर्णी लागते का हे पाहावे लागेल. पंजाबची गोलंदाजाची धुरा मोहम्मद शमीवर प्रामुख्याने आहे. त्याला युवा फिरकीपटू रवी बिश्नोई यांची साथ असणार आहे.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
- अॅरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वाशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अॅडम झम्पा, इसुरू उडाना, मोईन अली, जोश फिलीप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.
- किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ -
- के. एल. राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जिम्मी निशाम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), इशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बरार, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकंडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंह (यष्टीरक्षक), जगदीश सुचित, तजिंदर सिंह आणि हार्डस विलजोन.