शारजाह - आयपीएल २०२०मध्ये आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगत आहे. सलामीवीर शुबमन गिलचे अर्धशतक आणि कर्णधार इयान मॉर्गनच्या झटपट खेळीमुळे कोलकात्याने पंजाबसमोर २० षटकात ९ बाद १४९ धावा फटकावल्या. नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेल्या पंजाबने कोलकात्याचे अवघ्या १० धावांत ३ फलंदाज गारद केले. मात्र, त्यानंतर -मॉर्गनने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली. अखेर पंजाबने १९ व्या ओव्हरमध्ये लक्ष्य गाठत सामना संपवला. गिल-मॉर्गन जोडीची महत्त्वाची भागीदारी आणि लॉकी फर्ग्युसनने शेवटच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी यांच्या बळावर कोलकाताच्या संघाने २० षटकांत केवळ १४९ धावांपर्यंतच मजल मारली होती. या आव्हानाचा सामना करताना पंजाबकडून मनदीप सिंग (६६*) आणि ख्रिस गेल (५१) यांनी दमदार अर्धशतकं ठोकली. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
-
Half-centuries from Gayle (51) and Mandeep (66*) guide @lionsdenkxip to an 8-wicket win over #KKR
— IndianPremierLeague (@IPL) October 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/Ye2Tx7iO5Z #Dream11IPL pic.twitter.com/BLL2LAvxsw
">Half-centuries from Gayle (51) and Mandeep (66*) guide @lionsdenkxip to an 8-wicket win over #KKR
— IndianPremierLeague (@IPL) October 26, 2020
Scorecard - https://t.co/Ye2Tx7iO5Z #Dream11IPL pic.twitter.com/BLL2LAvxswHalf-centuries from Gayle (51) and Mandeep (66*) guide @lionsdenkxip to an 8-wicket win over #KKR
— IndianPremierLeague (@IPL) October 26, 2020
Scorecard - https://t.co/Ye2Tx7iO5Z #Dream11IPL pic.twitter.com/BLL2LAvxsw
पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने ग्लेन मॅक्सवेलच्या हातात चेंडू देत डावाची सुरुवात केली. मॅक्सवेलनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच षटकात नितीशा राणाला (०) झेलबाद केले. त्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर राहुल त्रिपाठी (७) आणि दिनेश कार्तिकला (०) एकाच षटकात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संघाचे तीन फलंदाज बाद झाले असताना गिल-मॉर्गनने भागिदारी रचली. मॉर्गनने २५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० तर, गिलने ३ चौकार आणि ४ षटकारासंह ५७ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर लॉकी फर्ग्युसनने शेवटी फटकेबाजी केली. त्याने १३ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २४ धावा ठोकल्या. पंजाबकडून शमीने ३, बिश्नोई आणि जॉर्डनने प्रत्येकी २, तर मॅक्सवेल आणि अश्विनने प्रत्येकी एक बळी घेतला.
LIVE UPDATE :
- पंजाबचा आठ गडी राखून कोलकात्यावर विजय
- मनदीपचे अर्धशतक, खेळीत ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- चौदा षटकानंतर पंजाबच्या १ बाद १०४ धावा.
- गेलची आक्रमक सुरुवात.
- पंजाबला ४८ चेंडूत ६४ धावांची गरज.
- दहा षटकानंतर पंजाबच्या १ बाद ६७ धावा.
- ख्रिस गेल मैदानात.
- राहुल २८ धावांवर बाद, चक्रवर्तीने पकडले पायचित.
- पंजाबला ९० चेंडूत ११६ धावांची गरज.
- पाच षटकानंतर पंजाबच्या बिनबाद ३५ धावा.
- पहिल्या षटकात पंजाबच्या बिनबाद ५ धावा.
- राहुलकडून पहिल्याच चेंडूवर चौकार.
- पॅट कमिन्सकडून कोलकातासाठी पहिले षटक.
- पंजाबच्या डावाला सुरुवात.
- २० षटकात कोलकाताच्या ९ बाद १४९ धावा.
- गिल ५७ धावांवर बाद, शमीला मिळाला बळी.
- कोलकाताला सातवा धक्का, कमिन्स पायचित, बिश्नोईचा दुसरा बळी.
- पंधरा षटकानंतर कोलकाताच्या ६ बाद ११४ धावा.
- शुबमन गिलचे अर्धशतक, खेळीत ४ षटकार आणि २ चौकारांचा समावेश.
- पॅट कमिन्स मैदानात.
- अश्विनने उडवला नागरकोटीचा त्रिफळा.
- कमलेश नागरकोटी मैदानात.
- सुनिल नरिन ६ धावावंर बाद, जॉर्डनने उडवला त्रिफळा.
- दहा षटकानंतर कोलकाताच्या ४ बाद ९२ धावा.
- सुनील नरिन मैदानात.
- मॉर्गन २५ चेंडूत ४० धावा करून बाद. खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश.
- दहाव्या षटकात मॉर्गन बाद, बिश्नोईले धाडले माघारी.
- नऊ षटकानंतर गिल ३५ तर मॉर्गन ३९ धावांवर नाबाद.
- पाच षटकानंतर कोलकाताच्या ३ बाद ३३ धावा.
- इयान मॉर्गन मैदानात.
- दोन षटकानंतर कोलकाताच्या ३ बाद १० धावा.
- शमीचा डबल धमाका, कार्तिक शून्यावर झेलबाद.
- दिनेश कार्तिक मैदानात.
- कोलकाताला दुसरा धक्का, शमीच्या गोलंदाजीवर त्रिपाठी झेलबाद.
- पहिल्या षटकात कोलकाताच्या १ बाद ९ धावा.
- त्रिपाठीकडून डावाचा पहिला षटकार.
- शुबमन गिल मैदानात.
- नितीश राणा शून्यावर बाद.
- ग्लेन मॅक्सवेल टाकतोय सलामीचे षटक.
- कोलकाताचे सलामीवीर त्रिपाठी-राणा मैदानात.
- नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, गोलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
कोलकाता नाइट रायडर्स -
इयान मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, सुनील नरिन, कुलदीप यादव, शुबमन गिल, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती.
किंग्ज इलेव्हन पंजाब -
केएल राहुल (कर्णधार), मनदीप सिंह, दीपक हुडा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मयांक अग्रवाल, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन.