ETV Bharat / sports

KKR vs SRH : कोलकाताचा हैदराबादवर सात गडी राखून विजय

author img

By

Published : Sep 26, 2020, 7:10 PM IST

Updated : Sep 27, 2020, 6:06 AM IST

अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आज कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवला गेला. यात कोलकाताने हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळवला.

KKR vs SRH
कोलकाताचा हैदराबादवर सात गडी राखून विजय

अबुधाबी - कोलकाता नाईट राईडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून पराभव करत मोसमातील पहिला विजय नोंदवला. हैदराबादने दिलेले १४२ धावांचे आव्हान कोलकोताने १८ षटकात पूर्ण केले. कोलकाताकडून फलंदाजी करताना शुभमन गिल याने सर्वाधिक ६२ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकांरासह नाबाद ७० धावा केल्या. तर त्याला इनय मॉर्गनने साथ दिली. मॉर्गनने जोरदार फटके मारले. त्याने २९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद ४२ धावा केल्या. तर नितीश राणा याने १३ चेंडूत ६ चौकारांसह २६ धावा केल्या. सुनील नारायण आणि कर्णधार दिनेश कार्तिक शून्यावरच बाद झाले. ७० धावांची नाबाद खेळी करणारा शुबमन गिल याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

तर हैदराबादकडून गोलंदाजी करताना खलील अहमद, थंगरसु नटराजन आणि रशीद खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. हैदराबादने कोलकाताला विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य दिले होते. १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॉर्गनने चौकार मारत कोलकाताने विजय मिळवला.

तत्पूर्वी हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैदराबादने २० षटकात ४ बाद १४२ धावा केल्या. मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज मनीष पांडेच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात १४२ धावा केल्या. हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो ३ धावांवर बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने बाद केले. मागच्या सामन्यात महागडा गोलंदाज ठरलेल्या पॅट कमिन्सने भन्नाट स्पेल टाकला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने मनीष पांडेला सोबत घेत संघाचा धावफलक हलता ठेवला. वॉर्नरने २ चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या. त्याला वरुण चक्रवर्तीने झेलबाद केले. वॉर्नरनंतर मनीष पांडे आणि वृद्धिमान साहाची जोडी खेळपट्टीवर स्थिरावली. या दोघांनी संघाला शंभर धावांचा टप्पा ओलांडून दिला.

मनीष पांडे ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर, साहा ३१ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. कोलकाताच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवर पकड ठेवली. मोहम्मद नबीने ८ चेंडूत ११ धावा केल्यामुळे हैदराबादला १३० धावांचा आकडा पार करता आला. हैदराबादकडून कमिन्स, रसेल आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. यंदाच्या हंगामात नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारणारा वॉर्नर हा पहिला कर्णधार ठरला आहे. दरम्यान, आजच्या या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता. या दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.

LIVE UPDATE :

  • कोलकाताचा शुबमन गिल सामनावीर
  • १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॉर्गनचा चौकार आणि कोलकाताचा विजय
  • १६ षटकानंतर कोलकाताच्या ३ बाद १२० धावा.
  • कोलकाताला २६ चेंडूत २८ धावांची गरज.
  • शुबमनचे अर्धशतक.
  • शुबमन-मॉर्गन जोडी खेळपट्टीवर स्थिरावली.
  • कोलकाताला विजयासाठी ४८ चेंडूत ५४ धावांची गरज.
  • १२ षटकानंतर कोलकाताच्या ३ बाद ८९ धावा.
  • इयान मॉर्गन मैदानात.
  • कोलकाताला विजयासाठी ८२ चेंडूत ९० धावांची आवश्यकता.
  • दिनेश कार्तिक शून्यावर बाद.
  • राशिद खानने घेतली दिनेश कातिकची विकेट.
  • कोलकाताच्या पहिल्या पाच षटकात २ बाद ४३ धावा.
  • नितीश राणा २६ धावांवर माघारी, टी. नटराजनने केले बाद.
  • नितीश राणा मैदानात.
  • कोलकाताचा पहिला फलंदाज बाद, सुनिल नरिनला खलील अहमदने शून्यावर धाडले माघारी.
  • एका षटकानंतर कोलकाच्या बिनबाद ५ धावा.
  • शुबमनकडून कोलकातासाठी पहिला चौकार
  • भुवनेश्वर कुमार टाकतोय हैदराबादसाठी पहिले षटक.
  • कोलकाताकडून शुबमन गिल आणि सुनिल नरिन मैदानात.
  • हैदराबादचे कोलकाताला विजयासाठी १४३ धावांचे आव्हान.
  • २० षटकात हैदराबादच्या ४ बाद १४२ धावा.
  • वृद्धिमान साहा शेवटच्या षटकात बाद. साहाच्या ३१ चेंडूत ३० धावा.
  • आंद्रे रसेल टाकतोय २०वे षटक
  • १८ षटकात हैदराबादच्या ३ बाद १२७धावा.
  • मोहम्मद नबी मैदानात.
  • मनीषच्या ५१ धावांच्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश.
  • मनीष पांडे अर्धशतक करुन माघारी, रसेलने केले बाद.
  • १५ षटकानंतर हैदराबादच्या २ बाद ९९ धावा.
  • मनिष पांडेने सांभाळली संघाची कमान.
  • १० षटकानंतर हैदराबादच्या २ बाद ६१ धावा.
  • वृद्धिमान साहा मैदानात.
  • डेव्हिड वॉर्नर ३६ धावांवर माघारी, वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर वॉर्नर झेलबाद.
  • आठ षटकानंतर वॉर्नर ३४ तर पांडे १० धावांवर नाबाद.
  • पहिल्या पाच षटकात हैदराबादच्या १ बाद ३३ धावा.
  • मनीष पांडे मैदानात.
  • बेअरस्टोच्या १० चेंडूत ५ धावा.
  • हैदराबादला पहिला धक्का, पॅट कमिन्सने जॉनी बेअरस्टोला धाडले माघारी.
  • तीन षटकानंतर हैदराबादच्या बिनबाद २२ धावा.
  • वॉर्नरने मारला सामन्याचा पहिला षटकार.
  • फिरकीपटू सुनिल नरिन टाकतोय कोलकातासाठी पहिले षटक.
  • हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो मैदानात.
  • सनरायझर्स हैदराबादने जिंकली नाणेफेक, प्रथम करणार फलंदाजी.

सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग XI -

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, खलील अहमद, टी. नटराजन, वृद्धिमान साहा, प्रियांम गर्ग.

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग XI -

दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनिल नरिन, कुलदीप यादव, शुबमन गिल, नितीश राणा, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिन्स, इयान मॉर्गन, वरुण चक्रवर्ती.

Last Updated : Sep 27, 2020, 6:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.