आबुधाबी - आयपीएल २०२० च्या गुणतालिकेत केकेआरने मोठा बदल केला आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सला केकेआरने पराभवाचा धक्का दिला. यानंतर गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. यात नेमके कोणते बदल झाला, हे जाणून घ्या...
राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ अव्वल स्थानावर विराजमान होता. कारण यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये राजस्थानने विजय मिळवलेला होता. पण कोलकाताने राजस्थानचा पराभव करत त्यांना मोठा धक्का दिला. या पराभवामुळे राजस्थानच्या संघाची थेट तिसऱ्या स्थानावर घसरण झालेली आहे. पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुन्हा एकदा पोहोचला आहे.
दुसरीकडे या संघातील सामन्यापूर्वी केकेआरचा संघ सातव्या स्थानावर होता. कारण, यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांमध्ये त्यांनी एका सामन्यात विजय मिळवला होता, तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण केकेआरने राजस्थानचा पराभव करत सातव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू दोन विजयासह चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय पंजाब, मुंबई आणि हैदराबाद एका विजयासह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमाकांवर आहेत. धोनीचा चेन्नई संघ दोन गुणांसह तळाशी आहे.
हेही वाचा - RR vs KKR : कोलकाताचा राजस्थानवर ३७ धावांनी विजय
हेही वाचा - IPL २०२० : मागील पराभव विसरून विजयासाठी मुंबई आणि पंजाब आतूर; कोण मारणार बाजी?