अबुधाबी - आयपीएल २०२०मध्ये आज तेरावा सामना मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणार आहे. मागील लढतीतील पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ पुनरागमनासाठी उत्सुक आहे. तर किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ चुका टाळून फॉर्म मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. किंग्स इलेव्हनला राजस्थान रॉयल्सविरुद्ध रविवारी पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सुपर ओव्हरमध्ये मात केली होती.
किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आश्वासक सुरूवात केली. पंजाबची सलीमीवीर जोडी सद्या सुसाट फॉर्मात आहे. के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल सातत्याने धावा करताना पाहायला मिळत आहे. असे असले तरी स्फोटक ग्लेन मॅक्सवेलला अद्याप लौकिकास पात्र कामगिरी नोंदवला आलेली नाही. पंजाबचे गोलंदाज फॉर्मात नसल्याचे दिसून आले. येवढेच नव्हे तर फॉर्मात असलेल्या शमीने ४ षटकांत ५३ धावा बहाल केल्या. याशिवाय शेल्डने कॉट्रेलही महागडा ठरला आहे. आजच्या सामन्यात पंजाबसाठी गोलंदाजी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला चांगली कामगिरी करावी लागेल. सलामीवीर क्विंटन डी कॉक लयीत नाही. मागील सामन्यात इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी चांगली फलंदाजी केली. पण पांड्या ब्रदर्सला अद्याप आली छाप सोडता आलेली नाही. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट धावा रोखण्यासाठी आणि गडी बाद करण्यात यशस्वी ठरले आहे. पण जेम्स पॅटिन्सला आतापर्यंत महागडा ठरला आहे. मुंबईला जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना पंजाबची फॉर्मात असलेली सलामीची जोडी राहुल व मयांक अगरवाल यांना झटपट बाद करावे लागेल.
- किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ -
- के. एल. राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशाम, निकोलस पूरण, इशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बराड, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकांडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंह, जगदीश सुचित, ताजिंदर सिंह आणि हार्डस विलोजेन.
- मुंबई इंडियन्सचा संघ -
- रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, इशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिशेल मॅकलानेगेन, मोहसिन खान, नाथन कूल्टर-नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेंट बोल्ट.