दुबई - आयपीएल २०२०मध्ये आज दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जाणार आहे. चेन्नईची पराभवाची हॅट्ट्रिक झाली आहे. यामुळे आपल्या उणिवा दूर करून ते विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे, पंजाबचा संघ दोन गुणांची कमाई करण्यासाठी उत्सुक आहे.
सीएसकेचा फलंदाज फाफ डु प्लेसिस वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला आपली छाप सोडता आलेली नाही. सलामीवीर शेन वॉटसन अपयशी ठरला आहे. पण मागील सामन्यात कर्णधार धोनी व रवींद्र जडेजा यांना सूर गवसल्याचे दिसले. अंबाटी रायुडूकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे. तर, ऋतुराज गायकवाड अपयशी ठरला आहे. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी, दीपक चाहर यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबचे सलामीवीर, कर्णधार केएल राहुल व मयांक अगरवाल शानदार फॉर्मात आहेत. दोघेही आक्रमक सुरुवात करण्यात माहीर आहेत. पण पंजाबचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. पंजाबची मर्यादित गोलंदाजी ही संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. मोहम्मद शमीचा अपवाद वगळता अन्य गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात अपयशी ठरले आहेत.
- चेन्नई सुपर किंग्जचा संघ -
- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), मुरली विजय, अंबाटी रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगिडी, दीपक चाहर, पीयूष चावला, इमरान ताहीर, मिशेल सँटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम कुरेन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.
- किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ -
- केएल राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स निशाम, निकोलस पूरण, इशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बराड़, दीपक हुड्डा, ख्रिस जोर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकांडे, रवी बिश्नोई, सिमरन सिंह, जगदीश सुचित, ताजिंदर सिंह आणि हार्डस विलोजेन.