ETV Bharat / sports

'जर रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला, तर ठोकू शकतो द्विशतक' - आयपीएल २०२०

आंद्रे रसेल तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी उतरला आणि त्याला ६० चेंडू खेळण्यास मिळाली, तर त्यात तो द्विशतक ठोकू शकतो, असे मत कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मुख्य मेंटर डेव्हिड हसीने व्यक्त केले आहे.

IPL 2020: "If Andre Russell bats at No.3, he can even score a double hundred," says David Hussey
'रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तर तो द्विशतकी ठोकू शकतो'
author img

By

Published : Sep 7, 2020, 2:54 PM IST

अबूधाबी - केकेआरचा आंद्रे रसेल, तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी उतरला आणि त्याला ६० चेंडू खेळण्यास मिळाली, तर त्यात तो द्विशतक ठोकू शकतो, असे मत कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मुख्य मेंटर डेव्हिड हसीने व्यक्त केले आहे. आयपीएलच्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. सर्व संघ विजेतेपद पटकवण्यासाठी सराव सत्रात घाम गाळत आहेत. अशात हसीने त्याचे मत व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे.

आयएएनएसशी बोलताना डेव्हिड हसी म्हणाला, २०१९ च्या आयपीएल हंगामात केकेआर संघाने चुकीचे निर्णय घेतले होते. त्याचा परिणाम संघाला भोगावे लागले. केकेआर प्ले ऑफपर्यंत पोहचू शकली नाही. मात्र, या हंगामात संघ व्यवस्थापनाकडून योग्य निर्णय घेतले जातील. यात आम्ही रसेलला वरच्या फळीत खेळवण्याचा विचार करत आहोत.

रसेलला जर वरच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवले तर याचा फायदा नक्कीस संघाला होईल. रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आणि त्याला ६० चेंडू खेळण्यास मिळाली, तर तो त्यात द्विशतकही झळकावू शकतो. रसेल काहीही करु शकतो, असेही हसीने सांगितलं.

दरम्यान, आंद्रे रसेलने मागील २०१९ च्या हंगामात खेळताना, दमदार प्रदर्शन केले होते. त्याने १३ डावात खेळताना ५६.६६ च्या सरासरीने ५१० धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने गोलंदाजीत ११ गडी टिपले होते. या हंगामातही केकेआरचा संघ रसेलकडू अशाच कामगिरीची आपेक्षा करत आहे.

हेही वाचा - CPL २०२० : राशिद खानने आंद्रे रसेलला भरसामन्यात घातली लाथ, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - IPL २०२० : सीएसकेनंतर दिल्ली संघात कोरोनाचा शिरकाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.