दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना मंगळवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. यात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने दिल्लीचा ५ गडी राखून धुव्वा उडवत आयपीएलचे पाचव्यांदा विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात दिल्लीने मुंबईसमोर विजयासाठी १५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान रोहित अॅण्ड कंपनीने ५ गडी आणि आठ चेंडू शिल्लक राखत पूर्ण केले आणि दिल्लीचे पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

आयपीएलमधील या विजयासह मुंबई इंडियन्स संघाने पाचव्यांदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. अशी कामगिरी करणारा मुंबई पहिलाच संघ ठरला. या विजयामुळे आयपीएलकडून विजेत्या मुंबईच्या संघाला आयपीएल चषक आणि २० कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली. तर उपविजेत्या दिल्लीच्या संघाला १२.५ कोटी रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांना (सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर) ८.७५ कोटींहून अधिक रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
याशिवाय कोणाला कितीचे मिळाले बक्षीस -
ऑरेंज कॅप - केएल राहुल (10 लाख),
पर्पल कॅप : कगिसो रबाडा (10 लाख)

इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर : देवदत्त पडिक्कल (10 लाख)
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द इयर : जोफ्रा आर्चर (10 लाख)
गेम चेंजर ऑफ द इयर : केएल राहुल (10 लाख)
सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन : केरॉन पोलार्ड (10 लाख)
पावर प्लेयर ऑफ द इयर : इशान किशन (10 लाख)
हेही वाचा - IPL २०२० : नाद नाय करायचा..! मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकलं विजेतेपद