आबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिला सामना जिंकत चेन्नई सुपर किंग्जने विजयी सुरुवात केली. चेन्नईने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून चेन्नईने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला १६२ धावांवर रोखले. या सामन्यात चेन्नईकडून फाफ डु-प्लेसिसने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दोन अप्रतिम झेल घेतले.
रवींद्र जाडेजा चेन्नई संघाकडून १५ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याचा पहिलाच चेंडू मैदानात स्थिरावलेल्या सौरभ तिवारीने उंच टोलावला. तो फटका सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या डु प्लेसिसने मोठ्या चपळाईने टिपला. यानंतर जाडेजाच्या त्याच षटकात डु-प्लेसिसने हार्दिक पांड्याचाही भन्नाट झेल घेत क्षेत्ररक्षणात आपले योगदान दिले. डु-प्लेसिस या दोन झेलमुळे चेन्नईला मुंबई इंडियन्सच्या धावगतीला वेसण घातला आली. याशिवाय डु-प्लेसिसने फलंदाजीतही आपले योगदान दिले.
- ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिलेल्या १६२ धावांचे लक्ष्य पार करताना खराब सुरुवात होऊनही चेन्नईने विजयश्री खेचून आणला. ६ धावांवर २ बाद अशी स्थिती असताना फाफ डू प्लेसिस आणि अंबाती रायडू यांनी डाव सावरला. फाफ डु प्लेसिसने ४४ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर अंबाती रायडूनेही शानदार ७१ धावांची खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. या दोघांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईला मात दिली.
हेही वाचा - IPL २०२० : दोन युवा कर्णधारांमध्ये लढत, कोण मारणार बाजी?
हेही वाचा - CSKvsMI : पहिल्या सामन्यात चेन्नईने मारली बाजी, मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून विजय