शारजाह - आज आयपीएलमध्ये 'डबल-हेडर'चा दुसरा सामना कोलकाता आणि दिल्ली यांच्यात रंगला. दिल्लीच्या जोरदार फलंदाजीपुढे कोलकाताला माघार घ्यावी लागली. १८ धावांनी हा सामना दिल्लीने आपल्या खिशात घातला. दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या २० षटकांत ८ गडी बाद २१० धावा झाल्या. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना कोलकाताला २२९ धावांचे आव्हान दिले होते. शारजाहच्या मैदानाची सीमारेषा तुलनेने लहान असल्याने यात दिल्लीच्या फलंदाजांनी धावांची लयलूट केली. कर्णधार श्रेयस अय्यर हा आजचा सामनावीर ठरला.
दिल्लीच्या फलंदाजांनी तुफान खेळी करत कोलकातासमोर मोठे आव्हान उभे केले होते. कोलकात्याकडून शुबमन गिलच्या २२ चेंडूंत २८ तर नितीश राणाच्या ३५ चेंडूंत ५८ धावा झाल्या. यानंतर आलेला आंद्रे रसेल केवळ १३ धावाच करू शकला. इयान मॉर्गनच्या फटकेबाजीने कोलकाताचा खेळ थोड्या प्रमाणात सावरला. मॉर्गनने केवळ १८ चेंडूंत ४४ धावा ठोकल्या. एनरिक नॉर्ट्जेने मॉर्गनचा बळी घेत त्याला तंबूत परतवले. यानंतर राहुल त्रिपाठीने कोलकाताची मदार आपल्या खांद्यावर घेत १६ चेंडूंत ३६ धावा केल्या. त्रिपाठीच्या फटकेबाजीला अखेर स्टॉइनिसने रोखले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय कोलकाताला चांगलाच महागात पडला. कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि सलामीवीर पृथ्वी शॉच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने कोलकातासमोर २० षटकात ४ बाद २२८ धावा केल्या. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीसाठी ५६ धावांची सलामी दिली. धवन २६ धावांवर माघारी परतला. वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केले. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या पृथ्वीने ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६६ धावा केल्या. अय्यरसोबत पृथ्वीने चांगली फटकेबाजी केली. पृथ्वी बाद झाल्यावर अय्यर आणि ऋषभ पंत यांनी कोलकाताच्या गोलंदाजांना हैराण केले. पंतने १७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ३८ धावा कुटल्या. तर, अय्यरने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांसह नाबाद ८८ धावा ठोकल्या. रसेल वगळता कोलकाताकडून सहा गोलंदाजांनी प्रती षटक दहाच्यावर धावा दिल्या. आंद्रे रसेलला दोन तर, चक्रवर्ती आणि नागरकोटीला प्रत्येकी एकल बळी मिळाला.
LIVE UPDATE :
- दिल्लीचा १८ धावांनी कोलकातावर विजय
- राहुल त्रिपाठीच्या धुवांधार ३६ धावा
- मॉरगन १८ चेंडूंत ४४ धावा काढून बाद.
- इयॉन मॉरगनची जोरदार फटकेबाजी.
- कर्णधार दिनेश कार्तिक ६ धावा काढून तंबूत परतला.
- रसेल ८ चेंडूंत १३ धावा काढून बाद.
- कोलकाताला विजयासाठी ६७ चेंडूत १४६ धावांची गरज.
- ८.५ षटकानंतर कोलकाताच्या २ बाद ८३ धावा.
- आंद्रे रसेल मैदानात.
- अमित मिश्राला शुबमनचा मिळाला बळी.
- कोलकाताला दुसरा धक्का, शुबमन २८ धावांवर माघारी.
- आठ षटकानंतर शुबमन २८ तर नितीश ३४ धावांवर नाबाद.
- शुबमन आणि नितीशची चिवट खेळी.
- पाच षटकात कोलकाताच्या १ बाद ४७ धावा.
- राणाकडून डावाचा पहिला षटकार.
- नितीश राणा मैदानात.
- कोलकाताचा नरिन माघारी, नॉर्ट्जेने उडवला त्रिफळा.
- पहिल्या षटकात कोलकाताच्या १ बाद ४ धावा.
- दिल्लीकडून कगिसो रबाडा टाकतोय पहिले षटक.
- कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि सुनील नरिन मैदानात.
- २० षटकात दिल्लीच्या ४ बाद २२८ धावा.
- अय्यरच्या ३८ चेंडूत नाबाद ८८ धावा.
- हेटमायर मैदानात.
- शेवटच्या षटकात स्टॉइनिस बाद.
- रसेल टाकतोय शेवटचे षटक.
- १९व्या षटकापर्यंत दिल्लीच्या ३ बाद २२१ धावा.
- कर्णधार श्रेयस अय्यरची वादळी खेळी.
- मार्कस स्टॉइनिस मैदानात.
- पंतच्या खेळीत ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- पंत १७ चेंडूत ३८ धावा करून माघारी.
- दिल्लीचा संघ अठराव्या षटकात दोनशेपार.
- १७ षटकानंतर अय्यर ६८ तर, पंत २४ धावांवर नाबाद.
- पंत-अय्यरची जोरदार फटकेबाजी.
- श्रेयस अय्यरचे वेगवान आयपीएल अर्धशतक, खेळीत ३ चौकार आणि २ षटकार.
- पंधरा षटकानंतर दिल्लीच्या २ बाद १५१ धावा.
- दिल्लीकडून ऋषभ पंत मैदानात.
- कमलेश नागरकोटीने पृथ्वीला केले बाद.
- ६६ धावांची खेळी करून पृथ्वी बाद. खेळीत ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश.
- पृथ्वी-श्रेयसची फटकेबाजी.
- कमलेश नागरकोटीला षटकार खेचत पृथ्वीने साजरे केले अर्धशतक.
- पृथ्वीचे धमाकेदार अर्धशतक. खेळीत ३ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश.
- दहा षटकात दिल्लीच्या १ बाद ८९ धावा.
- पृथ्वीच्या खेळीत ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- स्ट्रॅटेजिक टाईमआऊटपर्यंत पृथ्वी ४१ धावांवर नाबाद.
- दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात.
- वरुण चक्रवर्तीला मिळाला धवनचा बळी.
- दिल्लीला पहिला धक्का, धवन २६ धावांवर माघारी.
- पहिल्या पाच षटकात दिल्लीच्या बिनबाद ५१ धावा.
- पाचव्या षटकात धवनचे लागोपाठ दोन षटकार.
- शिखर-पृथ्वीची आक्रमक फटकेबाजी.
- पहिल्या षटकात दिल्लीच्या बिनबाद ८ धावा.
- पृथ्वीकडून दिल्लीच्या डावाचा पहिला सुंदर चौकार.
- पॅट कमिन्स टाकतोय कोलकातासाठी पहिले षटक.
- दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ मैदानात.
- नाणेफेक जिंकून कोलकाताचा गोलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग XI -
श्रेयस अय्यर (कर्णधार), रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), एनरिक नॉर्ट्जे, मार्कस स्टॉइनिस, हर्षल पटेल.
कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग XI -
दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, नितीश राणा, शिवम मावी, शुबमन गिल, सुनील नरिन, पॅट कमिंन्स, इयान मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी.