अबूधाबी - स्टार खेळाडू सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल २०२० मधून माघार घेतली आणि चेन्नई संघासमोरील अडचणीत वाढ झाली. रैनाच्या जागेवर कोणत्या खेळाडूची निवड करावी, हा प्रश्न चेन्नईसमोर उपस्थित झाला आहे. यादरम्यान, इंग्लंडच्या डेव्हिड मलानचे नाव चर्चेत आले. तेव्हा चेन्नई संघाचे सीईओ के. एस. विश्वनाथन यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
के.एस. विश्वनाथन म्हणाले, सुरेश रैनाच्या जागेवर आम्ही डेव्हिड मलानची निवड करणार नाही. कारण आमचा विदेशी खेळाडूंचा कोटा आधीच भरलेला आहे. यामुळे आम्हाला तसे करता नाही. सद्या आम्ही रिप्लेसमेंट विषयी कोणताही विचार करत नाही.
सुरेश रैनाच्या माघारी नंतर चेन्नईने अद्यापही नव्या खेळाडूची निवड केलेली नाही. अशात फलंदाजांच्या जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेणाऱ्या डावखुऱ्या मलानला सहभागी करून घेण्यासाठी चेन्नई उत्सुक असल्याचे वृत्त एका इंग्रजी माध्यमाने दिले. त्यावर, आम्ही मलानला आमच्या संघात सहभागी करुन घेऊ शकत नाही, असे के. एस. विश्वनाथन यांनी स्पष्ट केले. यामुळे चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मलानने सर्वाधिक १२९ धावा केल्या. याआधीही त्याने टी-२० क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. याच कामगिरीच्या जोरावर त्याने टी-२० क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे. दुसरीकडे रैना पाठोपाठ हरभजन सिंगनेही स्पर्धेतून माघार घेतली. या दोन्ही खेळाडूंच्या जागेवर चेन्नई अद्याप रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही.
हेही वाचा - Eng vs Aus : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १९ धावांनी विजय, बिलिंग्जचे शतक व्यर्थ
हेही वाचा - IPL चे 'आऐंगे हम वापस' साँग अडकले वादात, रॅपरने केला चोरीचा आरोप