दुबई - आज आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने हैदराबादला २० धावांनी नमवले. चेन्नईच्या गोलंदाजांनी केलेल्या 'सुपर' कामगिरीमुळे हैदराबादचा संघ २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावा करू शकला.
चेन्नई सुपर किंग्जच्या १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात चांगली झाली नाही. डेव्हिड वॉर्नर ९ धावांवर बाद झाला. तर, त्यानंतर आलेला मनीष पांडे ब्राव्होच्या थ्रोवर धावबाद झाला. फिरकीपटू रवींद्र जडेजाने बेअरस्टोला २३ धावांवर बाद केले. केन विल्यमसनने अर्धशतक झळकावत झुंज दिली, मात्र, तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. विल्यमसनने ७ चौकारांसह ५७ धावा केल्या. चेन्नईकडून कर्ण शर्मा आणि ब्राव्होने दोन तर, सॅम करन, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
तत्पूर्वी, मधल्या फळीत शेन वॉटसन आणि अंबाटी रायुडू यांनी दिलेल्या योगदानामुळे चेन्नईने हैदराबादविरुद्ध २० षटकात ६ बाद १६७ धावा केल्या. नाणेफेक जिंकून चेन्नईने फलंदाजीचा निर्णय घेत सॅम करन आणि फाफ डु प्लेसिसला सलामीला पाठवले. डु प्लेसिस शून्यावर बाद झाला. पण, करनने आक्रमक पवित्रा धारण करत हैदराबादच्या गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावा केल्या. प्लेसिस आणि करनला संदीप शर्माने माघारी धाडले.
या दोघांनतर शेन वॉटसन आणि अंबाटी रायुडूने मोर्चा सांभाळला. वॉटसनने ४२ तर रायुडूने ४१ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात धोनी आणि जडेजाने फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. धोनीने १३ चेंडूत २१ धावा केल्या. तर, जडेजा १० चेंडूत ३ षटकार आणि एका चौकारासह २५ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून संदीप शर्मा, खलील एहमद आणि टी. नटराजनने प्रत्येकी दोन बळी घेतले.
LIVE UPDATE :
- चेन्नईचा हैदराबादवर २० धावांनी विजय.
- २० षटकात हैदराबादच्या ८ बाद १४७ धावा.
- शेवटच्या षटकात नदीम बाद.
- शेवटच्या षटकात हैदराबादला २२ धावांची गरज.
- राशिद खान १४ धावा करून माघारी.
- शेवटच्या दोन षटकात हैदराबादला २७ धावांची गरज.
- राशिद खान-शाहबाज नदीमची जोडी मैदानात.
- केन विल्यमसनही माघारी, कर्ण शर्माचा तिसरा बळी.
- हैदराबादला विजयासाठी १८ चेंडूत ४६ धावांची गरज.
- हैदराबादचा पाचवा फलंदाज तंबूत. शंकर बाद.
- विल्यमसनचे अर्धशतक, खेळीत ६ चौकार.
- हैदराबादला विजयासाठी ३० चेंडूत ६७ धावांची गरज.
- १५ षटकानंतर हैदराबादच्या ४ बाद १०१ धावा.
- प्रियम गर्ग कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद.
- १४ षटकानंतर विल्यमसन ३९ धावांवर नाबाद.
- हैदराबादला विजयासाठी ४८ चेंडूत ९२ धावांची गरज.
- १० षटकानंतर हैदराबादच्या ३ बाद ६० धावा.
- प्रियम गर्ग मैदानात.
- बेअरस्टो २३ धावांवर बाद, जडेजाला मिळाला बळी.
- पाच षटकात हैदराबादच्या २ बाद ३४ धावा.
- केन विल्यमसन मैदानात.
- चार षटकानंतर हैदराबादच्या २ बाद २७ धावा.
- मनीष पांडे ४ धावांवर बाद.
- हैदराबादला पहिला धक्का, वॉर्नर ९ धावांवर माघारी.
- पहिल्या षटकात हैदराबादच्या बिनबाद ४ धावा.
- दीपक चहर टाकतोय चेन्नईकडून पहिले षटक.
- हैदराबादचे सलामीवीर मैदानात.
- २० षटकात चेन्नईच्या ६ बाद १६७ धावा.
- शेवटच्या षटकात ब्राव्हो शून्यावर बाद.
- धोनी २१ धावांवर बाद.
- जडेजा मैदानात.
- शेन वॉटसन ४२ धावांवर बाद. नटराजनला मिळाला बळी.
- सतरा षटकानंतर चेन्नईच्या ३ बाद १२९ धावा.
- धोनी मैदानात.
- रायुडू ४१ धावावंर बाद.
- पंधरा षटकानंतर चेन्नईच्या २ बाद ११६ धावा.
- १४ षटकानंतर रायुडू आणि वॉटसन प्रत्येकी ३४ धावांवर नाबाद.
- रायुडू-वॉटसनने सावरला चेन्नईचा डाव.
- दहा षटकानंतर चेन्नईच्या २ बाद ६९ धावा.
- आठ षटकानंतर वॉटसन १६ तर, रायुडू १२ धावांवर नाबाद.
- पाच षटकात चेन्नईच्या २ बाद ३९ धावा.
- करन ३१ धावांवर बाद, संदीप शर्माचा दुसरा बळी.
- सॅम करनची आक्रमक सुरुवात, खलीलच्या षटकात ठोकले २ चौकार आणि २ षटकार.
- शेन वॉटसन मैदानात.
- चेन्नईला पहिला धक्का, प्लेसिस बाद, संदीप शर्माने धाडले माघारी.
- करनकडून डावाचा पहिला चौकार.
- पहिल्या षटकानंतर चेन्नईच्या बिनबाद ३ धावा.
- संदीप शर्मा टाकतोय हैदराबादसाठी पहिले षटक.
- चेन्नईचे सलामीवीर प्लेसिस-करन मैदानात.
- नाणेफेक जिंकून धोनीसेनेचा फलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग XI -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अंबाटी रायुडू, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, दीपक चहर, पीयूष चावला, शार्दुल ठाकुर, सॅम करन, कर्ण शर्मा.
सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग XI -
डेव्हिड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, राशिद खान, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, टी. नटराजन.