ETV Bharat / sports

IPL २०२० मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न; सट्टेबाजाने खेळाडूशी साधला संपर्क - BCCI ACU on match fixing

युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामामध्ये मॅच फिक्सिंगसाठी सट्टेबाजांनी खेळाडूशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे.

IPL 2020: Buckeye approached a player while trying to fix match, BCCI ACU gave information
IPL २०२० मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न; सट्टेबाजाने खेळाडूशी साधला संपर्क
author img

By

Published : Oct 4, 2020, 3:10 PM IST

Updated : Oct 4, 2020, 3:28 PM IST

दुबई - युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामामध्ये मॅच फिक्सिंगसाठी सट्टेबाजांनी खेळाडूशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. याची माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाचे (एसीयू) प्रमुख अजित सिंग यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका सट्टेबाज एजंटने आयपीएलच्या खेळाडूशी मॅच फिक्सिंगबाबत संपर्क केला आहे. दरम्यान, सट्टेबाजांनी संपर्क साधलेला खेळाडू कोण आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बीसीसीआयच्या एसीयू प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले की, आयपीएलमध्ये एका खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी सट्टेबाजाकडून विचारणा करण्यात आली आहे. त्या खेळाडूने याची तात्काळ माहिती आम्हाला कळवली आहे. आम्ही त्या एजंटचा शोध घेत आहोत. पण, यासाठी थोडा वेळ लागेल. भ्रष्टाचारविरोधी नियमानुसार माहिती देणाऱ्या खेळाडूबाबत सध्या कोणालाही काहीही सांगण्यात येणार नाही.

दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी खास बायो बबल तयार करण्यात आला आहे. या बबलचे नियम कठोर करण्यात आले असून याचे पालन न करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा - DC vs KKR : दिल्लीने काही तासांत RCBकडून हिसकावले अव्वलस्थान, पाहा काय झाले गुणातालिकेत बदल

हेही वाचा - KKRने कार्तिकची हकालपट्टी करत 'या' खेळाडूला कर्णधारपद सोपवावे, भारतीय वेगवान गोलंदाजाचे मत

Last Updated : Oct 4, 2020, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.