ETV Bharat / sports

IPL चे 'आऐंगे हम वापस' साँग अडकले वादात, रॅपरने केला चोरीचा आरोप

आयपीएलचे अँथम माझ्या एका रॅपमधून चोरी करण्यात आला आहे. प्रणव अजयराव मालपेने काही वर्षांपूर्वी आलेल्या माझ्या रॅप साँगची कॉपी केली आहे, असे रॅपर कृष्णाचे म्हणणे आहे.

IPL 2020 Anthem Copied? Song Composer Pranav Ajayrao Malpe Refutes Rapper KR$NA's Claims
IPL चे 'आऐंगे हम वापस' साँग अडकले वादात, रॅपरने केला चोरीचा आरोप
author img

By

Published : Sep 10, 2020, 7:22 PM IST

मुंबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी १० दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. अशात आयपीएल स्पर्धा वादात अडकताना पाहण्यास मिळत आहे. हा वाद आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी लाँच करण्यात आलेल्या अँथम साँगमुळे सुरू झाला आहे. प्रसिद्ध रॅपर कृष्णाने हे गाणे चोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आयपीएलचे अँथम माझ्या एका रॅपमधून चोरी करण्यात आला आहे. प्रणव अजयराव मालपेने काही वर्षांपूर्वी आलेल्या माझ्या रॅप साँगची कॉपी केली आहे, असे रॅपर कृष्णाचे म्हणणे आहे. म्यूझिक डायरेक्टर अजयराव मालपेने आयपीएलच्या या हंगामासाठी 'आऐंगे हम वापस' हे अँथम साँग तयार केले आहे.

  • Hey guys, @IPL has plagiarised my song “Dekh Kaun Aaya Waapas” and created “Aayenge Hum Wapas” as this years anthem without credit or consent. I request my fellow artists and friends on twitter to RT this tweet for awareness, they can not get away with this. @DisneyPlusHS https://t.co/GDNFeyhXR5

    — KR$NA (@realkrsna) September 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कृष्णाच्या म्हणण्यानुसार, हे गाणे त्याच्या 2017 साली आलेल्या 'देख कौन आया वापस'ची कॉपी आहे. याविषयावर कृष्णाने संताप व्यक्त केला असून तो म्हणाला, आयपीएल आणि हॉटस्टार सारख्या मोठ्या कंपन्या परवानगी न घेता, माझ्या गाण्याची कॉपी करत आहेत. ही बाब चुकीची आहे. माझी मॅनेजमेंट टीम आणि लीगल टीम याबाबत कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

दुसरीकडे प्रणव अजय राव मालपेने आयपीएल अँथम ओरिजनल असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, म्यूझिक कंपोझर असोसिएशन ऑफ इंडियाने ही दोन्ही गाणी वेळी असल्याचे म्हटले असून, यावर कृष्णाने देखील असोसिएशनला फटकारले आहे.

आयपीएलने 6 सप्टेंबरला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 'आऐंगे हम वापस' हे गाणे पोस्ट केले. 93 सेकंदाच्या या व्हिडीओत कोरोना व्हायरसच्या संकटात कंटाळलेल्या लोकांमध्ये आयपीएल होत असल्याचा आनंद दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत ट्विटवर हा व्हिडीओ 4 लाख 75 हजार लोकांनी, तर यू ट्यूबवर 15 लाख लोकांनी पाहिला.

हेही वाचा - चेन्नईच्या व्यावसायिकाने घातला हरभजनला ४ कोटींचा गंडा, पोलिसात तक्रार दाखल

हेही वाचा - यॉर्कर टाकू नकोस, धोनीचा सल्ला पण बुमराहने टाकलचं; मग पुढे काय घडलं वाचा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.