ETV Bharat / sports

IPL 2020 : 'हे' तीन युवा विदेशी खेळाडू झळकावू शकतात शतक - शिमरोन हेटमायर

आयपीएलला सुरूवात होण्याआधीच आजपर्यंत महत्वाच्या ७ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. असे असताना देखील प्रत्येक संघात शतकी खेळी करू शकणारे युवा फलंदाज आहेत. यात कोणते परदेशी युवा खेळाडू शतक करू शकतील, याबाबतचा हा आढावा...

ipl 2020 : 3 young oversease batsman who could score century this season
IPL 2020 : 'हे' तीन युवा विदेशी खेळाडू झळकावू शकतात शतक
author img

By

Published : Sep 6, 2020, 3:51 PM IST

मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात येणार असल्याचे, गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं आहे. चाहत्यांमध्ये या हंगामाची उत्सुकता आहे. पण स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच आजपर्यंत महत्वाच्या ७ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. असे असताना देखील प्रत्येक संघात शतकी खेळी करू शकणारे युवा फलंदाज आहेत. यात कोणते परदेशी युवा खेळाडू शतक करु शकतील, याबाबतचा हा आढावा...

टॉम बॅन्टन (केकेआर ) -

ipl 2020 : 3 young oversease batsman who could score century this season
टॉम बॅन्टन

ख्रिस लिनला सोडल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल २०२०साठी आपल्या संघात टॉम बॅन्टनचा समावेश केला. सध्याच्या घडीला बॅन्टन सुसाट फॉर्मात आहे. त्याने बिग बॅश लीगमध्ये दमदार खेळ करत धावा जमवल्या आहेत. याशिवाय त्याने नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतही आपली छाप सोडली आहे. त्याने पहिल्या सामन्यात खेळताना ४२ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. बॅन्टन केकेआरकडून सलामीला उतरत शतक झळकावू शकतो.

जोश फिलीप (आरसीबी ) -

जोश फिलीप

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलीपला आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. २१ वर्षीय जोशने बिग बॅशच्या २०१९ हंगामात खेळताना १३०च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. या हंगामात त्याने ४८७ धावा चोपल्या. अंतिम सामन्यात खेळताना त्याने सिडनी सिक्सर्स संघासाठी २९ चेंडूत अर्धशतक झळकावलं होते. त्याच्या या खेळीच्या जोरावरच सिडनी सिक्सर्सने विजेतेपद पटकावले. या सामन्यात तो सामनावीर ठरला. त्याचे हे प्रदर्शन पाहता तो आयपीएलमध्ये शतक झळकावू शकतो.

शिमरोन हेटमायर (दिल्ली कॅपिटल्स ) -

शिमरोन हेटमायर

दिल्ली कॅपिटल्सने युवा फलंदाज शिमरोन हेटमायरला आपल्या संघात घेतलं आहे. हेटमायर आक्रमक फलंदाजीसाठी परिचित आहे. तो सद्य घडीला चांगल्या लयीत आहे. त्याने सीपीएलमध्ये सर्वाधिक २६७ धावा केल्या आहेत. सीपीएलमधून थेट आयपीएलमध्ये खेळण्यासाठी हेटमायर आला आहे. यामुळे तो आयपीएलमध्येही आपली लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. हा वेस्ट इंडिजचा युवा खेळाडूही आयपीएलमध्ये शतक झळकावू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.